Kasba Peth Vidhan Sabha Election Result 2024 Live : पुण्यातील कसबा पेठ विधानसभा मतदारसंघात भाजपचे हेमंत रासने यांनी १५व्या फेरीअखेर २१,१४२ मतांची मोठी आघाडी घेत काँग्रेसच्या रवींद्र धंगेकर यांना मागे टाकले आहे. पोटनिवडणुकीत गमावलेला बालेकिल्ला भाजपने पुन्हा जिंकण्याची जोरदार तयारी केल्याचे या निकालांवरून दिसत आहे.
१५व्या फेरीचे चित्र
हेमंत रासने (भाजप): ७३,३८१ मते, आघाडी: २१,१४२ मते
रवींद्र धंगेकर (काँग्रेस): ५२,२४० मते
मताधिक्य वाढतच...
मतमोजणीच्या सुरुवातीपासूनच रासने यांनी घेतलेली आघाडी १५व्या फेरीपर्यंत अधिक मजबूत झाली आहे. प्रत्येक फेरीत त्यांनी आपले मताधिक्य वाढवत ठेवले असून काँग्रेसचे रवींद्र धंगेकर यांना त्यांचा वेग रोखण्यात अपयश आले आहे.
भाजपसाठी महत्त्वाचा विजय
पोटनिवडणुकीत काँग्रेसने गाजवलेला विजय भाजपसाठी मोठा धक्का होता. मात्र, या निवडणुकीत हेमंत रासने यांनी भाजपचा बालेकिल्ला पुन्हा राखत पक्षासाठी प्रतिष्ठेचा विजय मिळवण्याची वाटचाल सुरू ठेवली आहे.
अंतिम निकालाकडे लक्ष
कसबा पेठ विधानसभा मतदारसंघात एकूण २० फेऱ्यांत मतमोजणी होणार आहे. १५व्या फेरीअखेर रासने यांचा विजय निश्चित दिसत असला, तरी पुढील फेऱ्यांत मताधिक्याचा आकडा किती वाढतो, याकडे सगळ्यांचे लक्ष लागले आहे.
भाजपचा बालेकिल्ला पुन्हा मजबूत
कसब्यात विजय झाल्यास राज्यात बहुमताच्या दिशेने वाटचाल करणाऱ्या भाजप महायुतीचा आनंद दुणावणार असून पोटनिवडणुकीतील पराभवाचा वचपा देखील काढता येणार आहे.