Kasba Peth Vidhan Sabha Election Result 2024 Live : पुण्यातील कसबा पेठ विधानसभा मतदारसंघात भाजपचे हेमंत रासने यांनी काँग्रेसचे रवींद्र धंगेकर यांना १९,४१३ मतांनी पराभूत करत विजयी मिळवला आहे. पोटनिवडणुकीतील पराभवानंतर भाजपने या गडावर पुन्हा वर्चस्व मिळवत आपला बालेकिल्ला कायम राखला आहे.
२०व्या फेरीअखेरचे अंतिम चित्र
हेमंत रासने (भाजप): १,०२,५७८ मते
रवींद्र धंगेकर (काँग्रेस): ८३,१६५ मते
मतांचा फरक: १९,४१३ मते
भाजपसाठी प्रतिष्ठेचा विजय
कसबा पेठ मतदारसंघ हा भाजपचा परंपरागत बालेकिल्ला राहिला आहे. मात्र, काही महिन्यांपूर्वी झालेल्या पोटनिवडणुकीत काँग्रेसने येथे विजय मिळवत भाजपला धक्का दिला होता. त्या पराभवाचे निवारण करत भाजपने पुन्हा एकदा आपले वर्चस्व सिद्ध केले आहे.
भक्कम आघाडीची सुरुवात
मतमोजणीच्या सुरुवातीपासूनच हेमंत रासने यांनी मोठी आघाडी घेतली होती. फेरी दर फेरीत त्यांनी आपले मताधिक्य वाढवत ठेवले. काँग्रेसचे उमेदवार रवींद्र धंगेकर यांनी झुंज दिली, मात्र अखेर रासने यांनी विजय मिळवला.
धंगेकरांचा पराभव
रवींद्र धंगेकर यांना काँग्रेसच्या पराभवाचा सामना करावा लागला. पोटनिवडणुकीतील विजयाच्या पुनरावृत्तीचा काँग्रेसचा प्रयत्न फोल ठरला. भाजपने पुन्हा एकदा कसबा पेठ विधानसभा मतदारसंघात आपला ठसा उमटवला आहे.
इथे क्लिक करा >महाराष्ट्र विधानसभा २०२४