कौस्तूभने इस्टोनियातील २६ वी आयर्नमॅन मोहीम १३ तास १४ मिनिटे व ०४ सेकंदांत पूर्ण केली. या मोहिमेत दिवसभर पाऊस पडत होता. तसेच जोरदार वारे यावर मात केली. त्याने जलतरणात ३.८ किमी अंतर ५२ मिनिटे व ३२ सेकंदात पूर्ण करताना ३५ ते ३९ वर्षे वयोगटात प्रथम स्थान मिळविले. त्यानंतर सायकलिंगमध्ये १८० किमी अंतर ६ तास ५९ मिनिटे व ४४ सेकंदात पूर्ण केल्यानंतर, ४२.२ किमी धावणे हे अंतरही ५ तास ३ मिनिटे व ४१ सेकंद वेळेत पूर्ण केले. या मोहिमेत तो ८३० व्या क्रमांकावर राहिला.
त्यापाठोपाठ, त्याने आठवडाभरात फ्रँकफर्टमध्ये २७ वी आयर्नमॅन युरोपियन स्पर्धा तेरा तास तीन मिनिटे व १५ सेकंद वेळेत पूर्ण करीत ही मोहीमही फत्ते केली. कौस्तूभ एकूण ७२० व्या क्रमांकावर राहिला. या स्पर्धेदरम्यान उष्ण हवामान असूनही त्याने जलतरणात ३.८ किमी अंतर ५२ मिनिटे व ५७ सेकंदात पूर्ण करीत प्रथम क्रमांक मिळविला. सायकलिंगमध्ये १८५ किमी अंतर ६ तास २१ मिनिटे व ०५ सेकंदात पूर्ण केल्यानंतर ४२.२ किमी धावणे हे अंतरही ५ तास ३५ मिनिटे व १५ सेकंद वेळेत पूर्ण केले. याआधी मुंबईच्या हार्दिक पाटीलने दहा वेळा आयर्नमॅन मोहीम पूर्ण केली आहे.
फोटो - स्पोर्ट्स राडकर