शांतता राखा : वढू ग्रामस्थ; छत्रपती संंभाजी महाराज, गोविंद गायकवाड यांच्या समाधीचे घेतले दर्शन
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 4, 2018 03:08 PM2018-01-04T15:08:55+5:302018-01-04T15:18:33+5:30
ग्रामस्थांनी गुरुवारी सामोपचाराने गावातील वाद मिटवला. तसेच एकत्रिपणे संभाजी महाराज आणि गोविंद गायकवाड यांच्या समाधीचे दर्शन घेतले.
पुणे : छत्रपती संभाजी महाराज यांच्या वढू बुद्रुक येथील समाधीजवळ लावण्यात आलेला फलक काढल्यामुळे गेल्या काही दिवसांमध्ये वाद निर्माण झाला होता. मात्र, ग्रामस्थांनी गुरुवारी सामोपचाराने गावातील वाद मिटवला. तसेच एकत्रिपणे संभाजी महाराज आणि गोविंद गायकवाड यांच्या समाधीचे दर्शन घेतले. यावेळी माजी सरपंच प्रफुल शिवले, पांडुरंग गायकवाड, रवींद्र गायकवाड, डी. डी. भंडारे आदी उपस्थित होते.
कोरेगाव भिमा येथे घेडलेल्या घटनेशी वढू ग्रामस्थांचा कोणताही संबंध नाही. राज्यात कोरेगाव भिमा येथील घटनेचे पडसाद उमटत आहेत. मात्र ग्रामस्थांमध्ये कोणताही वाद नाही. त्यामुळे सर्वांनी शांतता राखावी, असे आवाहन वढू बुद्रुक येथील ग्रामस्थांनी केले आहे.