खयाल गायकी पं. भीमसेन जोशी यांचे वैशिष्ट्य

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 15, 2021 04:11 AM2021-02-15T04:11:55+5:302021-02-15T04:11:55+5:30

पुणे : देशात महाराष्ट्र - कर्नाटक सीमाप्रश्नासारखे अनेक प्रश्न असताना त्याचा परिणाम होऊ न देता देश एकसंघ ठेवण्यामध्ये पंडित ...

Khayal Gaiki Pt. Feature of Bhimsen Joshi | खयाल गायकी पं. भीमसेन जोशी यांचे वैशिष्ट्य

खयाल गायकी पं. भीमसेन जोशी यांचे वैशिष्ट्य

Next

पुणे : देशात महाराष्ट्र - कर्नाटक सीमाप्रश्नासारखे अनेक प्रश्न असताना त्याचा परिणाम होऊ न देता देश एकसंघ ठेवण्यामध्ये पंडित भीमसेन जोशी यांच्या सुरांचे मोठे योगदान आहे. खयाल गायकी हे त्यांचे वैशिष्ट्य होते. आपल्या सारख्यांना त्यांचे सूर ऐकायला मिळाले, ते विसरणे अशक्य असल्याचे प्रतिपादन राष्ट्रवादी कॉंग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी केले.

स्वरभास्कर पं. भीमसेन जोशी यांच्या जन्मशताब्दी वर्षानिमित्त संगीताचार्य पंडित द. वि. काणेबुवा प्रतिष्ठानतर्फे आयोजित ‘खयाल यज्ञ’ या संगीत महोत्सवाला रविवारी सकाळी पवार यांनी सदिच्छा भेट दिली. यावेळी, पं. भीमसेन जोशी जन्मशताब्दी समितीचे अध्यक्ष खासदार गिरीश बापट, खासदार श्रीनिवास पाटील, गोविंद बेडेकर, मंजुषा पाटील, शौनक अभिषेकी,. संजय चितळे, डॉ. राजेंद्र शेंडे, हेमंत अभ्यंकर उपस्थित होते. महोत्सवाला मदत केल्याबद्दल श्रीकांत बडवे, सुप्रिया बडवे , पुनीत बालन यांचा सत्कार पवार यांच्या हस्ते करण्यात आला.

पवार म्हणाले, भारतरत्न पुरस्काराने गौरविण्यात आलेल्या पंडितजींच्या प्रती कृतज्ञता व्यक्त करण्याचा हा तीन दिवसांचा संगित महोत्सव उपक्रम पुणेकर रसिकांसाठी अभूतपूर्व संधी आहे. पुण्याची सांस्कृतिक उंची वाढविण्यासाठी या महोत्सवाचा उपयोग होईल असे पवार म्हणाले. सायंकाळी केंद्रीय मंत्री प्रकाश जावडेकर यांनी व्हिडीओ संदेशाद्वारे महोत्सवाला शुभेच्छा दिल्या. यासोबतच विधान परिषद उप सभापती डॉ. नीलम गो-हे या महोत्सवाला भेट दिली.

महोत्सवात रविवारी आरती अंकलीकर-टिकेकर, कलापिनी कोमकली, राहुल देशपांडे, निषाद बाक्रे, देवकी पंडित, विनय रामदासन, गौतम काळे, रघुनंदन पणशीकर, मंजुषा पाटील, पंडित राजन मिश्रा, पंडित साजन मिश्र इत्यादी मान्यवरांनी बहारदार गायनसेवा रुजू केली.पद्मभूषण पं. राजन आणि पं. साजन मिश्रा यांच्या उपस्थितीमध्ये ‘खयाल यज्ञाचा’ समारोप झाला. यापुढे वर्षभर विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आल्याची माहिती प्रतिष्ठानचे अध्यक्ष गोविंद बेडेकर आणि सचिव मंजुषा पाटील यांनी दिली.

मिलिंद कुलकर्णी, राहुल सोलापूरकर, आनंद देशमुख, डॉ. विनिता आपटे यांच्या निवेदनामुळे महोत्सवाला साज चढला. डॉ. विनीता आपटे यांनी सूत्रसंचालन केले. तर, खासदार बापट यांनी आभार मानले.

Web Title: Khayal Gaiki Pt. Feature of Bhimsen Joshi

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.