Khed Alandi Vidhan Sabha Election Result 2024 Live: खेड आळंदी विधानसभेत मशाल पेटली; बाबाजी काळेंचा दणदणीत विजय, मोहिते पाटलांचा पराभव
By ऑनलाइन लोकमत | Published: November 23, 2024 04:51 PM2024-11-23T16:51:50+5:302024-11-23T16:53:54+5:30
Khed Alandi Assembly Election 2024 Result Live Updates: बाबाजी काळे यांना १५०१५२ एवढी मते मिळाली तर राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे दिलीप मोहिते पाटील यांना ९८४०९ मते मिळाली
Khed Alandi Vidhan Sabha Election Result 2024 Live: खेड आळंदी विधानसभा मतदारसंघात झालेल्या निवडणुकीत शिवसेना उध्दव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे अधिकृत उमेदवार बाबाजी काळे यांचा सुमारे ५१७४३ मतांनी बाबाजी काळे दणदणीत विजय झाला. बाबाजी काळे यांना १५०१५२ एवढी मते मिळाली तर राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे दिलीप मोहिते पाटील यांना ९८४०९ मते मिळाली.
आज सकाळी हुतात्मा राजगुरू क्रीडा संकुलमध्ये झालेल्या मतमोजणीबद्दल तालुक्यातील नागरिकांमध्ये प्रचंड उत्सुकता होती. पहिल्या फेरीपासून शिवसेनेचे बाबाजी काळे यांनी आघाडी घेतली आणि शेवटच्या विसाव्या फेरीपर्यंत आघाडी टिकवली. तालुक्यातील सर्वच विभागांमध्ये बाबाजी काळे यांनी आघाडी घेतली. तालुक्यातील जनतेने बाबाजी काळे यांना भरभरून मते दिली. मतमोजणीच्या निमित्ताने तालुका क्रीडा संकुलमध्ये पोलिसांचा बंदोबस्त होता. २६ टेबलवरून २० मतमोजणीच्या फेऱ्या झाल्या. सुमारे १५० अधिकारी व कर्मचारी यांनी मतमोजणी प्रक्रिया पार पाडली. बाबाजी काळे यांच्या विजयानंतर राजगुरुनगर शहरात मिरवणूक काढण्यात करण्यात आली होती.निवडणूक निर्णय अधिकारी तथा प्रांताधिकारी अनिल दौंडे यांनी निवडणूक निर्णय जाहीर केली. या प्रसंगी मतमोजणी प्रक्रिया सुरळीत पार पाडण्यासाठी निवडणूक निरीक्षकांसह सहाय्यक निवडणूक निर्णय अधिकारी तथा तहसीलदार ज्योती देवरे, निवासी नायब तहसीलदार मदन जोगदंड, रवींद्र मोरे, राम बिजे, पी.डी. माळी, मनीषा खैरे आदिंसह महसूलचे सर्व अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते.