वर्गात अडकलेल्या चिमुरडीची सुटका

By admin | Published: September 26, 2015 02:39 AM2015-09-26T02:39:07+5:302015-09-26T02:39:07+5:30

शाळा सुटल्यानंतर घाईघाईने वर्गशिक्षिकेने वर्गाला कुलूप लावल्याने पहिलीतील एक विद्यार्र्थिनी आत अडकली. गावातील एका युवतीच्या

The kidneys stuck in the classroom | वर्गात अडकलेल्या चिमुरडीची सुटका

वर्गात अडकलेल्या चिमुरडीची सुटका

Next

केडगाव : शाळा सुटल्यानंतर घाईघाईने वर्गशिक्षिकेने वर्गाला कुलूप लावल्याने पहिलीतील एक विद्यार्र्थिनी आत अडकली. गावातील एका युवतीच्या व ग्रामस्थांच्या प्रसंगावधानामुळे तिला सुखरूप बाहेर काढण्यात आले. ही घटना दौंड तालुक्यातील खुटबाव येथे आज (दि. २५) घडली.
जान्हवी संतोष तोरणे (वय ६) असे या चिमुरडीचे नाव आहे. याबाबत अधिक माहिती अशी, की येथील जिल्हा परिषद प्राथमिक शाळा नेहमीप्रमाणे सायंकाळी ५ वाजता सुटली. सर्व विद्यार्थी वर्गाबाहेर गेले. मात्र, जान्हवी वर्गातच अडकली. वर्गशिक्षिकेने पाहणी न करताच कुलूप लावल्याने ती वर्गात अडकली. सायंकाळी ६च्या दरम्यान शाळेशेजारून एक युवती जात असताना तिला वर्गामध्ये रडण्याचा आवाज आला. सदर युवतीने प्रसंगावधान राखून तातडीने ग्रामस्थांशी संपर्क केला. त्यानंतर खुटबावचे सरपंच शिवाजी थोरात, कोंडिबा थोरात, राष्ट्रवादी तालुका उपाध्यक्ष शरद शेलार, नाना थोरात घटनास्थळी आले. तोपर्यंत या विद्यार्थिनीच्या वर्गशिक्षिका घाईघाईने पुण्याकडे रवाना झाल्या होत्या. या शाळेतील गावात राहणाऱ्या एका उपशिक्षिकेने घाईघाईने दुसरी चावी मिळवली व एक तासाच्या अवधीनंतर जान्हवीला बाहेर काढण्यात ग्रामस्थांना यश आले.
विषेश म्हणजे शुक्रवारी बकरी ईदची शाळेला सुट्टी होती. केवळ नशीब बलवत्तर म्हणून जान्हवी सुखरूप व अल्पवेळेत आई-वडिलांना मिळाली. सायंकाळी ५ वाजता जान्हवी पहिलीच्या वर्गात झोपली असल्याने वर्गशिक्षिकेने वर्ग तपासणी न करताच वर्गाला कुलूप लावल्याने ही घटना घडली. (वार्ताहर)

Web Title: The kidneys stuck in the classroom

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.