पुणे : कोरेगाव भीमा येथे उद्भवलेल्या दोन गटातील संघर्षामध्ये सार्वजनिक व खासगी मालमत्तेचे मोठे नुकसान झाले होते. या नुकसानीचे पंचनामे जिल्हा प्रशासनाकडून पूर्ण करण्यात आले आहेत. या दंगलीमध्ये एकूण ९ कोटीच्यावर नुकसान झाले आहे. कोरेगाव भीमा येथील विजय स्तंभास मानवंदना देण्यासाठी आलेल्या अनुयायांवर हल्ला करण्यात आला होता. त्यानंतर दोन गटात दंगल उसळली होती. यामध्ये दोन्ही बाजुने झालेल्या दगडफेक आणि तोडफोडीत वाहनांचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले होते. या नुकसानीचे जिल्हा प्रशासनाकडून पंचनामे करण्यास शुक्रवारी रात्रीच सुरूवात करण्यात आली होती. शिरूरच्या नायब तहसीलदारांच्या नेतृत्वाखाली पथके तयार करण्यात आली होती. यामध्ये महसूल विभागाचे मंडल अधिकारी, ग्रामसेवक आणि पोलीस प्रशासनाच्या प्रतिनिधींचा समावेश करण्यात आला होता. तीन जणांच्या विविध पथकांनी अभ्यासपुर्वक हे पंचनामे करून जिल्हा प्रशासनाला सादर केले आहेत.
प्रकार | संख्या | रक्कम |
चारचाकी | २८ | ४८६६००० |
दुचाकी | २८ | ९८४७२५ |
तीनचाकी | ४ | ३९७००० |
घर | ४ | ३१००००० |
दुकान | १३ | ३७९०००० |
गॅरेज | ९ | ४११६२०० |
बस | ३ | ३७४५००० |
ट्रक | ८ | १७१७००० |
जेसीबी | १ | १००००० |
अग्निशामक | १ | ८०००० |
हॉटेल | ६ | १४१५००० |
एकूण | १०५ | २४३१०९२५ |