कोथरूड मतदार संघात पहिल्या फेरीत भाजपचे चंद्रकांत पाटील ८ १ ० ० मतांनी आघाडीवर

By ऑनलाइन लोकमत | Published: November 23, 2024 08:59 AM2024-11-23T08:59:15+5:302024-11-23T09:04:36+5:30

kothrud  Vidhan Sabha Election Result 2024 Live : कोथरूड मतदार संघात भाजचे चंद्रकांत पाटील यांच्या विरोधात उद्धवसेनेचे चंद्रकांत मोकाटे रिंगणात आहे

kothrud  Vidhan Sabha Election Result 2024 Live | कोथरूड मतदार संघात पहिल्या फेरीत भाजपचे चंद्रकांत पाटील ८ १ ० ० मतांनी आघाडीवर

कोथरूड मतदार संघात पहिल्या फेरीत भाजपचे चंद्रकांत पाटील ८ १ ० ० मतांनी आघाडीवर

kothrud  Vidhan Sabha Election Result 2024 Live  : आज सकाळी मतमोजणीला सुरुवात झाली असून पुण्यातील कोथरूड मतदारसंघाच्या मतमोजणीतील पहिल्या फेरीची आकडेवारी समोर आली आहे. या फेरीत भाजचे चंद्रकांत पाटील आघाडीवर ८ १ ० ० मतांनी आहे. 

पुण्यातील कोथरूड मतदार संघात भाजचे चंद्रकांत पाटील यांच्या विरोधात उद्धवसेनेचे चंद्रकांत मोकाटे रिंगणात आहे. चंद्रकांत मोकाटे यांनी यापूर्वीही या मतदारसंघाचं नेतृत्व केलेलं आहे. मनसेने किशोर शिंदे यांना पुन्हा मैदानात उतरवले होते. किशोर शिंदे यांनी २०१९ ला पाटील यांच्याविरोधात चांगली लढत दिली होती.  

२०१९ मध्ये भाजपाने चंद्रकांत पाटील यांना उमेदवार म्हणून निवडले. चंद्रकांत पाटील यांनी १,०५,२४६ मतांनी विजय मिळवला होता, तर महाराष्ट्र नवनिर्माण सेना (एमएनएस) चे किशोर शिंदे ७९,७५१ मतांनी दुसऱ्या क्रमांकावर होते. या निवडणुकीत भाजपाने आपली पकड कायम ठेवली, ज्यामुळे त्यांना या मतदारसंघावर आपली सत्ता कायम राखण्यास मदत झाली. चंद्रकांत पाटील यांचा अनुभव आणि नेतृत्व कौशल्यामुळे भाजपाला येथे विजय मिळवण्यात सोपे झाले.

दरम्यान, पुणे जिल्ह्यातील २१ विधानसभा निवडणुकीसाठी आज होणाऱ्या मतमोजणीच्या ४६५ फेऱ्या होणार असून दुपारी तीनपर्यंत सर्व निकाल हाती येतील.

कोथरूड मतदार संघ पहिली फेरी
आघाडीवर -   चंद्रकांत पाटील आघाडीवर ८ १ ० ० मते  

Web Title: kothrud  Vidhan Sabha Election Result 2024 Live

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.