वंशाच्या दिव्यासाठी विवाहितेला विवस्त्र करून फासला अंगारा; पती, सासूसह भोंदूबाबाविरोधात गुन्हा

By ऑनलाइन लोकमत | Published: August 30, 2021 07:16 AM2021-08-30T07:16:10+5:302021-08-30T07:16:19+5:30

पती, सासूसह भोंदूबाबाविरोधात गुन्हा

For the lamp of the tribe, undress the bride and burn the embers | वंशाच्या दिव्यासाठी विवाहितेला विवस्त्र करून फासला अंगारा; पती, सासूसह भोंदूबाबाविरोधात गुन्हा

वंशाच्या दिव्यासाठी विवाहितेला विवस्त्र करून फासला अंगारा; पती, सासूसह भोंदूबाबाविरोधात गुन्हा

Next

चाकण (जि. पुणे) : दोन्ही मुलीच झाल्यानंतर वंशाला दिवा हवा म्हणून पती व सासू या दोघांनी मिळून पत्नीच्या संपूर्ण शरीरावर भोंदूबाबाकडून आणलेला अंगारा आणि हळदी-कुंकू फासले. खालुंब्रे (ता. खेड) येथे हा अघोरी प्रकार घडला. पीडित महिलेने तक्रार केल्यानंतर पती, सासू आणि भोंदूबाबांच्या विरोधात चाकण पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, या महिलेला दोन मुली झाल्या. हे कारण तसेच लग्नात तिच्या आईवडिलांनी मानपान केला नसल्याच्या कारणावरून आरोपींनी विवाहितेला वेळावेळी मारहाण केली. वंशाला दिवा म्हणून मुलगा असावा, असा तिचा पती व सासूचा आग्रह होता. पीडित महिलेवर ते वारंवार अत्याचार करत मारहाण करत होते.  

मुलगा व्हावा यासाठी हे दोघे कामशेत (ता. मावळ) येथील एका भोंदूबाबाकडे तिला घेऊन गेले. तिला समोर बसवल्यावर बाबाने हातातील कवड्या जमिनीवर टाकून मंत्र पुटपुटत हिशोब केल्याचे हातवारे केले. महिलेला मुलगा होण्यासाठी अंगारा खायला दिला. तसेच काही अंगारा कागदामध्ये बांधून दिला. आणि काही सूचना पती व सासूला केल्या.

वेळोवेळी मारहाणही 
मुलगा होत नसल्याचे कारण तसेच लग्नात तिच्या आईवडिलांनी मानपान केला नसल्याच्या कारणावरून आरोपींनी विवाहितेला वेळावेळी मारहाण केली.

Web Title: For the lamp of the tribe, undress the bride and burn the embers

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.