रिंगरोडसाठी मिशन मोडवर भूसंपादन
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 13, 2021 04:24 AM2021-01-13T04:24:36+5:302021-01-13T04:24:36+5:30
- पहिल्या टप्प्यात 68 किलोमीटरसाठी भूसंपादन लोकमत न्यूज नेटवर्क पुणे : महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळाचा (एमएसआरडीसी) रिंगरोडसाठी ...
- पहिल्या टप्प्यात 68 किलोमीटरसाठी भूसंपादन
लोकमत न्यूज नेटवर्क
पुणे : महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळाचा (एमएसआरडीसी) रिंगरोडसाठी नुकतीच राज्य शासनाने अधिसूचना जाहीर केली आहे. यामुळे आता पहिल्या टप्प्यात भोर तालुक्यातील कळवडे ते मावळ तालुक्यातील उर्से हा या 68 किलोमीटर लांबीचा पश्चिम रिंगरोड विकसित होणार आहे. पुणे आणि पिंपरी-चिंचवड शहराची वाहतूक कोंडी फोडण्यासाठी या रिंगरोडसाठी पुढील सहा महिन्यांत मिशन मोडवर भूसंपादन करण्यात येणार आहे. यासाठी आता दर आठवड्याला बैठक घेणार असल्याची माहिती जिल्हाधिकारी डाॅ.राजेश देशमुख यांनी सांगितले.
गेल्या अनेक वर्षांपासून प्रस्तावित असलेल्या रिंगरोडच्या कामाला आता प्रत्यक्षात सुरूवात होणार आहे. पुणे-पिंपरी चिंचवड शहरातील वाहतुकीची कोंडी फोडण्यासाठी एमएसआरडीसीने रिंगरोड प्रकल्प हाती घेतला आहे. तसेच या रिंगरोडला राज्य सरकारकडून “विशेष राज्य महामार्गा’चा दर्जा देखील देण्यात आला आहे. तसेच हा रिंगरोड करण्यासाठी नोडल एजन्सी म्हणून राज्य शासनाने एमएसआरडीसीची नियुक्ती केली आहे. रस्त्यासाठी भूसंपादनासाठीचा निधी राज्य सरकारच्या मदतीने उभारता येणार आहे. रिंगरोडच्या भूसंपादनासाठी यापूर्वी चार पर्याय निवडण्यात आले होते. मात्र, हे सर्व पर्याय बाजूला ठेऊन थेट खरेदीने भूसंपादन करण्याचा राज्य सरकारने घेतला आहे. या रिंगरोडच्या भूसंपादनासाठी स्वतंत्र अधिकारी नियुक्त केले आहेत. या अधिका-यांची आता दर आठवड्याला आढावा घेऊन भूसंपादनाच्या कामाला गती देणार असल्याची माहिती डाॅ.राजेश देशमुख यांनी दिली.
------
असा होणार रिंगरोड रोड
- पहिल्या टप्प्यात रिंगरोडची लांबी 68 किलोमीटर
- केळवडे (ता.भोर) पासून उर्से (ता. मावळ) पर्यंत
- रिंगरोड सहा पदरी आणि 8 बोगदे
– खडकवासला बॅकवॉटरवरून मोठा पूल
– एकूण छोटे पूल – 3, उड्डाणपूल – 2
– रिंगरोडवरून प्रतिदिन 60 हजार वाहने धावतील
– न्यू मार्गावर जाण्यासाठी सहा ठिकाणी इंटरचेंज
– रिंगरोडसाठी सुमारे 750 हेक्टर जागेची आवश्यकता
– प्रकल्पाची एकूण किंमत सुमारे 10 हजार कोटी रुपये
--------
या गावांमध्ये होणार भूसंपादन
पुणे-मुंबई द्रुतगती महामार्गावरील उर्से (ता. मावळ) येथून सुरुवात परंदवाडी-धामणे- बेबडओहोळ-चांदखेड-पाचाणे (ता.मावळ) – पिंपळोली- केमसेवाडी -जवळ- पडळघरवाडी- रिहे – मातेरेवाडी – घोटावडे – अंबडवेट- भरे – कासारआंबोली – उरावडे – आंबेगाव – मारणेवाडी – मोरेवाडी – भरेकरवाडी – कातवडी (ता. मुळशी) – बहुली- भगतवाडी -सांगरुण – मांडवी बुद्रुक – मालखेड – वरदाडे – खामगाव मावळ – घेरा सिंहगड – मोरदरवाडी – कल्याण – रहाटावडे (ता. हवेली) – रांजे- कुसगाव -खोपी- कांजळे- केळवडे (ता. भोर) येथील पुणे -सातारा