तळेगाव ढमढेरे :
शिवतक्रार म्हाळुंगी येथील भीमा नदीवरील कोल्हापूर पद्धतीच्या नादुरुस्त बंधाºयामुळे मोठ्या प्रमाणावर पाण्याची गळती होत असल्यानेहजारो लिटर पाणी वाया जात आहे. संबंधित विभागाने या बंधाºयाची त्वरित दुरुस्ती करावी, अशी मागणी ग्रामपंचायत सदस्य उमेश काळे व ग्रामस्थांनी केली आहे. या वेळी शाखा अभियंता पी. वाय. सोनावणे यांच्याशी संपर्क साधून त्यांना तातडीने बंधाºयाच्या गळतीबाबत माहिती दिली असल्याचे उमेश काळे यांनी सांगितले. दुरुस्तीसाठी पुन्हा नव्याने खर्चाचा प्रस्ताव तयार करून तो मंजुरीसाठी देऊन काम पूर्ण होणे गरजेचे असल्याचे काळे यांनी संबंधितांना सांगितले.
या वेळी सोसायटीचे संचालक मनोज वडघुले, निवास साकोरे, हर्षवर्धन काळभोर, प्रवीण वडघुले, विलास काळे, संजय काळे, तुषार नरसाळे व शेतकरी उपस्थित होते.आलेगाव पागा दरम्यान भीमा नदीवर एकूण ८ बंधारे आहेत. त्यापैकी हा बंधारा सर्वांत जुना आहे. हा बंधारा नादुरुस्त असल्याने यातून मोठ्या प्रमाणावर पाण्याची गळती होत असल्याने शेतकºयांचे नुकसान होत आहे. यामुळे या बंधाºयाची दुरुस्ती करण्याची मागणी जलसंपदा विभागाकडे केली आहे.दुष्काळात तेरावा महिना..सध्या हा बंधारा पाण्याने भरलेला असून, येथील शेतकºयांना कमी पाऊस झाल्याने बंधाºयातील हे पाणी वरदान ठरत आहे. शेतातील पाण्याचा व जनावरांच्या पिण्याच्या पाण्याचा प्रश्न सध्या सुटला आहे, परंतु अशा अवस्थेत सततची होणारी मोठ्या प्रमाणात पाण्याची गळती हा प्रश्न गंभीर होऊन शेतकºयांवर उपासमारीची वेळ येईल. यासाठी तातडीने बंधाºयाची होणारी गळती थांबवावी अशी मागणी येथील ग्रामस्थांनी केली.शिवतक्रार म्हाळुंगी येथील कोल्हापूर पद्धतीचा बंधाºयाची गळती राहिल्यास पुढील २ महिनेही पाणी पुरणार नाही. यावर्षी पाऊस कमी झाल्याने पाणी कमी पडण्याची शक्यता आणि त्यात असा पाण्याचा अपव्यय झाल्याने नदीलगतची पिके धोक्यात येण्याची शक्यता आहे.