जुन्नर तालुक्याचे पूर्व भागातील राजुरी उंचखडक परिसरात गेल्या काही महिन्यांपासून बिबट्याचा संचार वाढला आहे. बिबट्याच्या हल्ल्यात अनेक पाळीव प्राणी ठार झाल्याच्या घटना घडल्या आहेत. दहशतीमुळे नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण पसरले होते. २० दिवसांपूर्वी राजुरी शिवारातील गव्हाळीमळा येथे बिबट्याच्या हल्ल्यात ३ वर्षांचा बालक जखमी झाला होता. यामुळे येथे पिंजरा लावण्याची मागणी ग्रामस्थांनी केली होती. त्यानुसार वनविभागाने बिबट्याला जेरबंद करण्यासाठी पिंजरे लावले होते. सुहासनगर डोबीमळा येथे सुदाम खंडू हाडवळे यांच्या शेतात लावलेल्या पिंजऱ्यात शुक्रवारी रात्री भक्ष्याच्या शोधात फिरणारा बिबट्या जेरबंद झाला. जेरबंद झालेला बिबट्या मादी जातीचा चार वर्षे वयाचा आहे. त्यास माणिकडोह बिबट्या निवारण केंद्रात हलविण्यात आल्याची माहिती ओतूर वनपरिक्षेत्र अधिकारी योगेश घोडके यांनी दिली.
180921\img-20210918-wa0237.jpg
राजुरी येथे वनविभागाचे पिंज-यात जेरबंद झालेला बिबट्या.