कवठे येमाई येथे बिबट्या जेरबंद

By admin | Published: May 28, 2016 04:16 AM2016-05-28T04:16:24+5:302016-05-28T04:16:24+5:30

कवठे येमाई माळीमळा येथे शिरूर वन विभाग व ग्रामस्थांच्या सहकार्याने बिबट्या पकडण्यात यश आले. गेल्या दोन ते अडीच महिन्यांपासून या बिबट्याचा या भागात वावर होता.

Leopard Jeraband at the Kavate Yemai | कवठे येमाई येथे बिबट्या जेरबंद

कवठे येमाई येथे बिबट्या जेरबंद

Next

कान्हूर मेसाई : कवठे येमाई माळीमळा येथे शिरूर वन विभाग व ग्रामस्थांच्या सहकार्याने बिबट्या पकडण्यात यश आले. गेल्या दोन ते अडीच महिन्यांपासून या बिबट्याचा या भागात वावर होता.
बिबट्याने १० ते १२ कुत्री, ८ ते १० मेंढ्या, ७ ते ८ वासरे यांचा फडशा पाडला होता. या परिसरात नागरिकांचे जवळपास दीड ते दोन लाखांपर्यंत आर्थिक नुकसान झाले होते.
गेल्या दोन महिन्यांपासून वनविभागाला हा बिबट्या गुंगारा देत होता. शेवटी शुक्रवारी पहाटे २ च्या सुमारास वन विभागाच्या पिंजऱ्यात बिबट्या अडकला आणि या परिसरातील ग्रामस्थांनी अखेर सुटकेचा नि:श्वास सोडला. सुदैवाने आजपर्यंत कुठलीही जीवितहानी झाली नाही हे विशेष. अद्यापही मादी जातीचा बिबट्या व त्याचे २ बछडे या परिसरात असून, पुन्हा वन विभागाने पिंजरा लावावा, अशी मागणी संचालक राजाराम शिंदे, रामदास शिंदे, अंकुश शिंदे यांनी केली आहे.
(वार्ताहर)

Web Title: Leopard Jeraband at the Kavate Yemai

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.