Pune | घोडनदीतीरी गावांमध्ये बिबट्याची दहशत सुरूच; स्थानिकांमध्ये भीतीचे वातावरण
By ऑनलाइन लोकमत | Published: February 6, 2023 08:20 PM2023-02-06T20:20:52+5:302023-02-06T20:25:02+5:30
उसतोडणी सुरू असल्याने बिबट्याची पिल्लेदेखील अनेक वेळा उसाच्या शेतात आढळली...
कवठेयेमाई (पुणे) : शिरूर तालुक्याचे पश्चिम भागामध्ये घोडनदीतीरी असलेल्या गावांमध्ये बिबट्याची दहशत सुरूच आहे. परिसरामध्ये उसतोडणी सुरू असल्याने बिबट्याची पिल्लेदेखील अनेक वेळा उसाच्या शेतात आढळली आहेत.
कवठे येमाई येथे नदी किनारी असलेल्या ईचके मळा येथे संध्याकाळी सहा वाजता नवनाथ ईचके यांचे घरासमोरून बिबट्याने शेळीचे करडू तोंडात धरून बिबट्या उसाचे शेतामध्ये पसार झाला.
हिलाळ्ववस्ती येथे शेतामध्ये रात्री आठ वाजता सोबत दोन बिबटे आढळल्याने नागरिकांची तारांबळ उडाली. फटाक्याचा आवाज करून बिबट्यांना शेतामधून पळविण्यात आले. वन विभागाने परिसरात पिंजरे लावून बिबट्यांचा बंदोबस्त करण्याची मागणी ग्रामपंचायत सदस्य राजेश सांडभोर यांनी वन विभागाकडे केली आहे.