तृणभक्षक प्राण्यांची व जंगलातील पाणवठ्यांची संख्या घटल्यानेही भक्षाच्या शोधात बिबट्यांनी आपला मोर्चा गावांकडे वळवला आहे. चाकण नगरपरिषद हद्दीतील पाठरवाडी हा परिसर तसा बागायती शेतीचा भाग आहे. जवळून भामा नदी वाहते यामुळे बारामाही ऊस शेतीसह विविध पिकांच्या बागायती शेती असल्याने या भागात विविध वन्य प्राण्यांचे अधूनमधून दर्शन होत असते. पठारवाडी येथील शेतकऱ्यांनी काल रात्री नऊच्या सुमारास बलदंड बिबट्या पळत असल्याचे काही ग्रामस्थांना दिसलेय त्यांनी तातडीने ही बाब वनविभागाला कळविली आहे. त्यानंतर वन विभागाच्या अधिकाऱ्यांनी यांनी संबंधित ठिकाणी भेट देऊन पाहणी केली आहे. हा बिबट्या वाकी कडवस्ती बाजुला गेला असल्याचे स्थानिकांनी सांगितले आहे. चाकण वनपरिक्षेत्राचे योगेश महाजन यांनी पठारवाडी नागरिकांना सतर्क राहण्यास सांगितले आहे. तसेच वन विभागाच्या वतीने स्थानिक नागरिकांमध्ये जनजागृती केली. वनविभाग या भागात पेट्रोलिंग करणार असल्याचे वनरक्षक यांनी सांगितले. या बिबट्याचा त्वरित बंदोबस्त त्वरित करावा, अशी मागणी नागरिक करीत आहेत.
--------------------------------------------------------
फोटो : ०४ चाकण पठारवाडीत बिबट्या
फोटो - चाकण जवळील पठारवाडी येथे बिबट्या आढळल्याने परिसराची पाहणी करून नागरिकांना सावध राहण्याच्या सूचना देताना वन विभागाचे कर्मचारी.