चला भीमा नदीला प्रदूषणापासूून वाचवू या!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 7, 2017 03:11 AM2017-08-07T03:11:43+5:302017-08-07T03:11:43+5:30

सह्याद्री पर्वतांमधून महाराष्ट्राची भूमी सुजलाम् सुफलाम् करणारी अमृतवाहिनी भीमानदी बाहेर पडली आहे. भीमाशंकर येथून उगम पावलेली ही नदी कृष्णेपर्यंत वाहात जाते. मात्र तिला ‘काळ्या पाण्या’ची शिक्षा झाल्याचे वास्तव आहे.

Let's save Bhima River from pollution! | चला भीमा नदीला प्रदूषणापासूून वाचवू या!

चला भीमा नदीला प्रदूषणापासूून वाचवू या!

googlenewsNext

लोकमत न्यूज नेटवर्क
भीमाशंकर : सह्याद्री पर्वतांमधून महाराष्ट्राची भूमी सुजलाम् सुफलाम् करणारी अमृतवाहिनी भीमानदी बाहेर पडली आहे. भीमाशंकर येथून उगम पावलेली ही नदी कृष्णेपर्यंत वाहात जाते. मात्र तिला ‘काळ्या पाण्या’ची शिक्षा झाल्याचे वास्तव आहे. भविष्यात या प्रदूषणाचे गंभीर दुष्परिणाम जाणवणार असून नदीकाठच्या लोकांना जलसाक्षर करण्यासाठी जल बिरादरीच्या पुढाकाराने सोमवारपासून भीमाशंकर येथून जलसाक्षरता मोहीम सुरू होणार आहे. त्यानिमित्त पर्यावरणतज्ज्ञांनी चला भीमेला प्रदूषणापासून वाचवूया, असे आवाहन केले आहे.
या नदीवरील अतिक्रमणं, शोषण आणि प्रदूषण यातुन तिला मुक्त करण्यासाठी तसेच पुढच्या पिढीची आणि सामान्य माणसांची नदीप्रती जबाबदारी निश्चित व्हावी, या दृष्टीने ‘नमामी चंद्रभागा जलसाक्षरता यात्रा’ सुरू होत आहे.
ही नदी प्राचीन असून तिच्या साक्षीने इतिहास घडला, लोकसंस्कृती फुलली, राजकारण रंगले. मात्र आज या भीमेचे स्वरूप पूर्वीसारखे राहिले नाही. भीमाशंकरमधून उगम पावलेल्या या नदीचे रूपडे राजगुरुनगरपासून बदलत गेले आहे. मुळा, मुठा नद्यांतून येणाºया दूषित पाण्यामूळे निरभ्र स्वच्छ दिसणारे पाणी काळे होत चालले आहे, पूर्ण विळखा दिला आहे. खराब पाण्यामुळे मासे टिकत नाही, नुसते अस्वच्छ व घाण पाण्याने नदी दूषित झाली आहे.
उजनीमध्ये भीमा कमालीची अस्वच्छ व प्रदूषित झाली आहे. अनेक उद्योगधद्यांचे खराब पाणी भीमेत सोडले जाते. तसेच शेतीसाठी पाण्याच्या अतिरिक्त उपसा होत असतो. वाळूउपाशाचा मोठा फटका भीमेला बसला आहे. नदीचे पात्रच बदलले आहे. धोक्याच्या बाहेर गेलेल्या भीमा नदीला वाचविण्यासाठी ही यात्रा काढली आहे. जल बिरादरीने काश्मीर ते कन्याकुमारी या कार्यक्षेत्रात १०१ ठिकाणी नदीसंवाद, जलसाक्षरता यात्रा आयोजित केल्या होत्या. विजापूर येथे देशभरातून निघालेल्या १०१ यात्रांचे समायोजन होणार असून तेथे दि. १६ ते १८ आॅगस्ट २०१७ कालावधीत डॉ. राजेंद्र सिंह यांच्या मार्गदर्शनाखाली राष्ट्रीय जल संमेलन होणार असल्याचे जल बिरादरीच्या वतीने सांगण्यात आले.
या यात्रेचा शुभारंभ आज भीमाशंकर येथून सकाळी १० वाजता होत असून या दरम्यान नमामी चंद्रभागा उपक्रमाच्या कृती नियोजनाबाबत लोकसंवाद, विद्यार्थी संवाद, संत वारकारी संप्रदाय प्रतिनिधींशी चर्चा असे कार्यक्रम होणार आहेत. ८ आॅगस्ट रोजी मंचर, राजगुरूनगर, ९ रोजी देहू, आळंदी , १० रोजी पुणे, ११ रोजी यवत, केडगाव, पाटस व दौंड, १२ रोजी कुरकुंभ, भिगवण, पळसदेव, रांजणी, अकोले, नीरा नरसिंहपूर, १३ रोजी पंढरपूर, दि.१४ रोजी सोलापूर येथे यात्रा पोहचणार असल्याचे पुणे वन्यजीव विभागाच्या सहायक वनसंरक्षक कीर्ती जमदाडे-कोकाटे यांनी सांगितले.

काय आहे भीमा नदीचा इतिहास?

सध्या भीमाशंकर मंदिराकडे जाताना पायºयांपासून डाव्या बाजुला उंच टेकडीवर एक मंदिर व मंदिराच्या बाजुला कुंड आहे. या कुंडाला भीमकुंड म्हणतात. हे कुंड पुरूषभर खोल असून त्यामध्ये जिवंत पाझर आहे. याच ठिकाणी भीमेचा मूळ उगम आहे.
भीमाशंकरमधून निघालेल्या भीमेच्या प्रवाहाला अनेक लहान मोठे ओढे, नद्या मिळतात व हळुहळू भीमेचे पात्र मोठे होत जाते. पुण्यापासून ईशान्य दिशेला तुळापूर या ठिकाणी देहू आळंदीच्या संतभूमीतून आलेली इंद्रायणी भीमेला मिळते. भीमेच्या तेजस्वी पाण्यावर चासकमान, उजनीसारखी मोठी धरणे झाली आहेत. या पाण्याने लाखो हेक्टर शेती आज ओलीता खाली आली आहे.

Web Title: Let's save Bhima River from pollution!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.