शहरं
Join us  
Trending Stories
1
राज ठाकरेंमुळे अदित्य ठाकरेंची आमदारकी वाचली; गेल्यावेळी थेट पाठिंबा, यावेळी...
2
Maharashtra Assembly Vidhan Sabha Election 2024 Result Highlights: महायुतीची त्सुनामी, मविआसह मनसेलाही तडाखा; राज ठाकरेंचे एकाच वाक्यात भाष्य, म्हणाले...
3
शपथविधीचे ठिकाण ठरले? राजभवनावर होणार नाही, पुन्हा वानखेडेवर भव्यदिव्य करण्याच्या हालचाली
4
Maharashtra Vidhan Sabha Election Result 2024 Live: विजयाचा 'गोडवा', 'जिलेबी सेलिब्रेशन' अन् महायुतीच्या नेतेमंडळींचा तुफान जल्लोष
5
Dahanu Vidhan Sabha Election Result 2024 Live : भगव्या वादळात फडकले लाल निशाण, डहाणूत माकपचे विनोद निकोले विजयी
6
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 Results : "निकाल येतील जातील...; तुमचा 'राजूदादा' ही हाक आयुष्यात कमावलेली सर्वात मोठी संपत्ती"
7
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 Results : आर आर आबांच्या रोहितने मैदान मारलं; सर्वात कमी वयाचे आमदार
8
विकास, सुशासन, जय महाराष्ट्र...! राज्यातील महायुतीच्या विजयावर काय म्हणाले PM मोदी? हेमंत यांचंही केलं अभिनंदन
9
महाराष्ट्रात मोठा विजय मिळवणाऱ्या भाजपाचा झारखंडमध्ये दारुण पराभव, 'इंडिया'चा निर्विवाद विजय
10
"अनपेक्षित आणि अनाकलनीय निकाल’’, दारुण पराभवानंतर उद्धव ठाकरेंची प्रतिक्रिया
11
Maharashtra Assembly Vidhan Sabha Election 2024 Result Highlights: सब से बडे खिलाडी! सर्वाधिक मताधिक्याने विजयी झालेले महाराष्ट्रातील १० ‘महारथी’
12
Maharashtra Assembly Election Result 2024: भाजप आणि महायुतीला बदनाम करण्याचा प्रयत्न करणाऱ्यांना हे सडेतोड उत्तर, अशोक चव्हाणांचा विरोधकांना टोला
13
Dindoshi Assembly Election: संजय निरुपम पराभूत; निकराच्या लढतीत सुनील प्रभू विजयी
14
महायुतीच्या विजयामुळे गौतम अदानींना अच्छे दिन? धारावी पुनर्विकास प्रकल्पाचा मार्ग मोकळा...
15
Maharashtra Election Results: देवेंद्र फडणवीसांना मुख्यमंत्री झालेलं बघायचं का? दिवीजा फडणवीस म्हणाली...
16
Maharashtra Assembly Vidhan Sabha Election 2024 Result Highlights: देवेंद्र फडणवीस पुन्हा मुख्यमंत्री व्हावेत असे वाटते का? अमृता फडणवीस म्हणाल्या...
17
काँग्रेसला मोठा धक्का, माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांचा पराभव, कराड दक्षिणेत अतुलपर्व!
18
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 Results Highlights : भाजपचा एक डाव अन् दोन राज्यांत काँग्रेसचा 'सुपडा साफ'! गेम चेंजर ठरला हा प्लॅन 
19
उत्तर प्रदेशमध्ये योगींचा जलवा, पोटनिवडणुकीत भाजपाचा दणदणीत विजय, सपाला धक्का 
20
शिंदेंचा शिलेदार ठरला संगमनेरमध्ये जायंट किलर; थोरातांना पराभूत करणारे अमोल खताळ कोण आहेत?

फटाक्यांमुळे प्रदूषणाची पातळी दोनशेवर, रात्री सर्वत्र धूरच धूर

By ऑनलाइन लोकमत | Published: November 15, 2020 4:08 PM

Pollution in Pune : शहरातील पीएम २.५ ची पातळी दोनशेवर गेली होती. जी आरोग्यासाठी धोकादायक आहे. 

पुणे : कोरोनामुळे दिवाळीलाफटाके फोडण्यावर काहीसे बंधने घालण्यात आली होती. परंतु, नागरिकांनी उत्साहामध्ये फटके फोडले. दरवर्षीप्रमाणे यंदा ‘आवाज’ जरा कमीच होता. पण रात्री दहाच्या सुमारास सर्वत्र धूर धूर दिसत होता. परिणामी शहरातील पीएम २.५ ची पातळी दोनशेवर गेली होती. जी आरोग्यासाठी धोकादायक आहे. 

लॉकडाऊनमुळे हवेची पातळी धोकादायकवरून चांगली या स्थितीवर आली होती. अनलॉकनंतर पुन्हा जैसे थे परिस्थिती झाली. त्यात दिवाळीतफटाके फोडल्याने ती धोकादायक बनली.  प्रदूषणामुळे विविध आजारांचा त्रास होतो. कोरोनामुळे दिवाळीत फटाके फोडणे अत्यंत धोकादायक असल्याची जनजागृती फुप्फुसविकारतज्ज्ञ आणि चेस्ट रिसर्च फांउडेशनचे प्रमुख डॉ. संदीप साळवी यांनी केली होती. त्याबाबतचा व्हिडिओ देखील त्यांनी तयार करून व्हायरल केला होता.  ज्यांना फुप्फुसाचा, हृदयाचा आजार आहे, अस्थमा, ब्लडप्रेशर आहे, त्यांना या फटाक्यांच्या धुराने अधिक त्रास होऊ शकतो. 

प्रदूषणाचा शरीरावर काय परिणाम? 

शहरात कार्बन डायऑक्साइड, धुलिकण, बॅक्टेरिया, विषाणू, विविध परागकण आपण श्वासाद्वारे शरीरात घेत असतो. जे आपल्या शरीराला हानी पोचवतात. यामुळे हृदयावर परिणाम होऊन हायपरटेंशन, हृदयाचे आजार, हृदय बंद पडणे असा धोका असतो. फुप्फुसांना इन्फेक्शन, विसराळूपणा, अस्थमा, फुप्फुसाचा कॅन्सर, स्ट्रोक, अल्झायमर असे आजार होऊ शकतात.  पीएम २.५ हवेची पातळी ० ते ५० : उत्तम ५० ते १०० : समाधानकारक १०० ते २०० : धोकादायक २०० ते ३०० : अत्यंत धोकादायक 

शिवाजीनगर :२०० कात्रज : १३५ हडपसर : १०२ भूमकर चौक : १३२भोसरी : १०२ पाषाण : ८४

टॅग्स :Puneपुणेpollutionप्रदूषणDiwaliदिवाळीfire crackerफटाके