लोहगाव विमानतळ विस्तारीकरणाला अखेर मुहूर्त

By ऑनलाइन लोकमत | Published: October 13, 2018 08:19 PM2018-10-13T20:19:04+5:302018-10-13T20:23:05+5:30

लोहगाव विमानतळाच्या विस्तारीकरणाला अखेर मुहूर्त मिळाला असून २० आॅक्टोबरला या कामाचे भुमिपूजन करण्यात येणार आहे.

Lohaggaon airport expansion soon | लोहगाव विमानतळ विस्तारीकरणाला अखेर मुहूर्त

लोहगाव विमानतळ विस्तारीकरणाला अखेर मुहूर्त

Next
ठळक मुद्देपहिल्या टप्प्यात सुसज्ज इमारतीसह ३५८ कोटी रुपयांची विविध विकासकामे संरक्षण मंत्रालयाकडून विस्तारीकरणासाठी १६ एकर जागा आता लोहगाव विमानतळावर वडापाव आणि भेळीवरही ताव मारता येणार

पुणे : लोहगावविमानतळाच्या विस्तारीकरणाला अखेर मुहूर्त मिळाला असून २० आॅक्टोबरला या कामाचे भुमिपूजन करण्यात येणार आहे. विस्तारीकरणाच्या कामाच्या रखडलेल्या प्रक्रियेतील सर्व अडथळे दुर झाले आहेत. पहिल्या टप्प्यात सुसज्ज इमारतीसह ३५८ कोटी रुपयांची विविध विकासकामे केली जाणार आहेत. 
मागील काही वर्षांपासून लोहगावविमानतळाच्या विस्तारीकरणाचे काम रखडले होते. एकीकडे विमान प्रवाशांची संख्या झपाट्याने वाढत असताना विस्तारीकरणाअभावी प्रवाशांना चांगल्या सोयी-सुविधा देणे शक्य होत नव्हते. तसेच विमान उड्डाणांच्या संख्येवरही मर्यादा येत आहेत. २०१३ -१४ मध्ये ३५ लाख ९६ हजार ६८४ प्रवाशांचा आकडा २०१७ - १८ मध्ये ८१ लाख ६४ हजार ८४० वर पोहचला आहे. पुढील वर्षीपर्यंत ही संख्या एक कोटीचा टप्पा पार करण्याची शक्यता आहे. त्यामुळे विस्तारीकरण करणे आवश्यक होते. आता जागेसह त्यामधील सर्व अडथळे दुर झाले आहेत. संरक्षण मंत्रालयाकडून विस्तारीकरणासाठी १६ एकर जागा मिळाली आहे. या कामासाठी केंद्र सरकारकडून ८०० कोटींची निधी मंजूर करण्यात आला आहे. त्यामुळे दि. २० आॅक्टोबरला या कामाचे भुमीपुजन करून प्रत्यक्ष कामाला सुरूवात केली जाईल. पुढील तीन ते साडे तीन वर्षांत हे काम पूर्ण करण्याचे उद्दिष्ट असल्याची माहिती खासदार अनिल शिरोळे आणि विमानतळ संचालक अजयकुमार यांनी पत्रकार परिषदेत दिली. 
पहिल्या टप्प्यात ४२ हजार चौरस मिटर क्षेत्रफळाची इमारत उभारली जाईल. या इमारतीमध्ये पार्किंग, पाच सरकते जिने यांसह प्रवाशांसाठी सर्व आवश्यक सुविधा असतील. कार्गो आणि विमान कंपन्यांच्या विमानांसाठी १० एकर जागेचा वापर केला जाईल, असे अजयकुमार यांनी सांगितले. विस्तारीकरणासाठी परिसरातील आणखी ३५ एकर जागा मिळण्यासाठी प्रयत्न आहे. तसेच नवीन धावपट्टीसाठी २०० ते २५० एकर जागेची गरज असून त्यासाठी सातत्याने पाठपुरावा सुरू असल्याचे शिरोळे यांनी सांगितले.
-----------------------
वडापाव, भेळीवर मारा ताव
विमानतळावर गेले की तेथील चकचकीत रेस्टॉरंटमध्ये सहसा फास्टफूडच जास्त मिळते. त्याच्या किंमतीही जास्त असतात. त्यामुळे अनेकजण याठिकाणी जाणे टाळतात. पण आता लोहगाव विमानतळावर वडापाव आणि भेळीवरही ताव मारता येणार आहे. विमानतळावर लवकरच भेळ आणि वडापावचे आउटलेट सुरु केले जाणार असून टेंडर प्रक्रिया सुरु झाली आहे. स्थानिक पदार्थ उपलब्ध करून देण्याची मागणी होती, असे अजय कुमार यांनी सांगितले. 
 

Web Title: Lohaggaon airport expansion soon

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.