- सचिन शिंदेवडगाव मावळ : मावळ तालुक्यातील ग्रामीण भागात असलेल्या आढले बुद्रुक ग्रामपंचायतीचा निकिता नितीन घोटकुले यांनी पदभार स्वीकारल्यानंतर गावाचा कायापालट होण्यास वेग आला. गावातील महिलांना बचत गटांच्या माध्यमातून रोजगार निर्माण करुन दिला. त्याचबरोबर गावांत दारुबंदी करण्यात आली.रोजगारनिर्मितीत ‘लोकमत सरपंच अॅवार्डस’ने या गावच्या माजी सरपंच व विद्यमान पंचायत समिती सदस्या निकिता घोटकुले यांना सन्मानित करण्यात आले. त्यांनी ६ जानेवारी २०१२ ला आढले बु।। ग्रामपंचायतची सूत्रे हाती घेतली. यापूर्वी गावातील रस्ता, वीज, पाणी, शाळा या सर्वच गोष्टींची अत्यंत दैयनीय अवस्था होती. या समस्या सोडवायचे घोटकुले यांनी ठरवले खरे, परंतु त्या काळात ग्रामपंचायतच्या बँक खात्यात एक रुपयाही शिल्लक नव्हता. गावातील बोरवेलच्या मोटार जळल्या होत्या अन् पाणीही बंद होते. या सर्व अडचणींचा सामना करत घोटकुले यांनी सर्व सहकाºयांच्या मदतीने सर्वप्रथम स्वखर्चाने मोटार दुरुस्त करून पाणी चालू करून घेतले.अन् विकासाच्या विकासच्या नव्या पर्वाची सुरवात झाली. एक एक विषय हाती घेत तो पूर्ण करण्याचे ठरवले. मात्र, हे स्वत: सर्व समजून घेणे गरजेचे होते. यासाठी त्यांनी सर्व सदस्यांना घेऊन आदर्श ग्रामपंचायत असणाºया पोपटराव पवार यांच्या हिवरे बाजार व अण्णा हजारे यांच्या राळेगणसिद्धीला भेट देऊन पाणी नियोजन आणि ग्रामपंचायतचा कारभार समजून घेतला. या भेटीदरम्यान गावात यशदा मार्फत माईक्रो प्लॅनिंग होणे गरजेचे असल्याची माहिती मिळाली. खर्च खूप होता पण ग्रामपंचायतमध्ये शिल्लक काहीच नव्हते, मग पुन्हा स्वखर्चाने यशदामार्फत माईक्रो प्लॅनिंग करून घेतले. अन् मग सुरू केली कामाची नॉनस्टॉप मालिका.गावाचा विकास करायचा असेल, तर मुले शिकली पाहिजेत यासाठी त्यांनी गावातील सर्वच शाळेतील मुलांना गणवेश, टाय, मोजे, बूट यांचे वाटप केले. जिल्हा परिषद शाळेतील चोरीला गेलेल्या संगणकामुळे शिक्षण थांबू नये. यासाठी नवीन संगणक दिले. शाळेत रंगकाम करण्यासह मुलांना शाळेत पाण्याची व्यवस्था केली. तसेच शाळेत शौचालयाची व्यवस्था, ई-लर्निंग, छत दुरुस्ती, खेळण्यासाठी मैदान यासह कार्यक्रमासाठी स्टेज घोटकुले यांनी बनवून दिला. यानंतर गावातील प्रत्येक वाडीवस्तीपर्यंत रस्ते पोहोचायला पाहिजेत, असा संकल्प करून रस्त्यांच्या कामाला सुरुवात केली.निसर्गाचे संवर्धनगावातच असणाºया नैसर्गिक साधनांचा उपयोग करून गणेशमूर्तीची निर्मिती करून गावातील महिलांना प्रशिक्षित केले व त्यापासून रोजगार निर्मिती झाली. आता गावातून महिलांनी बनवलेले गणपती दरवर्षी परदेशात मोठ्या प्रमाणात विक्री होतात. तर यातून महिलांना चांगला रोजगार मिळतो. त्याचबरोबर कुरड्या, पापड्या, लोणचे महाराष्ट्रातील जुने पदार्थ घरगुती पद्धतीने बनवण्यास सुरुवात केली. याचवेळी गावात कृषी पर्यटनाची सुरुवात झाली. गावातील गरजू लोकांना रोजगार उपलब्ध होऊ लागला़ त्याचप्रमाणे गावात आतापर्यंत पाच हजारांच्यावर झाडे लावण्यात आली आहेत. स्मशानभूमी, शाळा, हॉस्पिटल या ठिकाणी स्वखर्चाने झाडे लावण्यात आली.जलयुक्तशिवार यशस्वीपंचगंगा औषध निर्मिती, गांडूळ खत असे उपक्रम गावात चालू करून दिले. सेंद्रियखत झीरो बजेट शेती याच गावातून सुरवात झाली. या काळात गावातील सरकारी दवाखान्याची अत्यंत दुरवस्था झाली होती. यात नागरिक उपचार घेण्यासाठी येत नव्हते. अशावेळी निकिता या पुढे येऊन मोडकळीस आलेल्या भिंती, गळणारे छत दुरुस्त करून घेतले, पूर्ण रंगकाम करून घेतले, नवीन प्रयोगशाळा बांधून घेतली. प्रशस्त स्वच्छतागृह बांधून घेतले. यशदातर्फे सूक्ष्म नियोजन करून ‘पाणी अडवा पाणी जिरवा’ व जलयुक्त शिवार यांच्या माध्यमातून वैयक्तिक योजनेतूनविहिरी तलाव शेततळे यांची निर्मिती केली. ओढ्यावर आठ ठिकाणी कोल्हापुरी बंधारे,छोटे पाटबंधारे यांची निर्मिती केली.