लोणी काळभोरला तेल बचाओ अभियान
By Admin | Published: February 16, 2017 02:55 AM2017-02-16T02:55:07+5:302017-02-16T02:55:07+5:30
पेट्रोलियम कंपन्यांच्या वतीने आयोजित करण्यात आलेल्या सक्षम २०१७ तेल बचाओ अभियानाला लोणी काळभोर येथे सुरुवात करण्यात आली असून,
लोणी काळभोर : पेट्रोलियम कंपन्यांच्या वतीने आयोजित करण्यात आलेल्या सक्षम २०१७ तेल बचाओ अभियानाला लोणी काळभोर येथे सुरुवात करण्यात आली असून, हे अभियान एक महिना चालणार आहे. या अंतर्गत विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे.
या अभियानामध्ये हिंदूस्थान पेट्रोलियम कॉर्पोरेशन लिमिटेड, भारत पेट्रोलियम कॉर्पोरेशन लिमिटेड, इंडियन आॅईल कॉर्पोरेशन लिमिटेड या तेल उत्पादक कंपन्यांसमवेत पेट्रोलियम कंझर्व्हेशन रिसर्च असोसिएशन (पीसीआरए) ही संस्था सहभागी झाली आहे.
कदमवाकवस्ती येथील हिंदूस्थान पेट्रोलियम कॉर्पोरेशन लिमिटेडच्या प्रांगणात या अभियानास सुरुवात झाली.
याप्रसंगी हिंदूस्थान पेट्रोलियम कॉर्पोरेशन लिमिटेडचे वरिष्ठ व्यवस्थापक जी. जी. देवळीकर, भास्कर झा, उपप्रबंधक संजीवकुमार, भारत पेट्रोलियम कॉर्पोरेशन लिमिटेडचे वरिष्ठ व्यवस्थापक महेंद्र दळवी, इंडियन आॅईल कॉर्पोरेशन लिमिटेड टर्मिनल मॅनेजर डी. एस. दाभाडे, सेल्स आॅफिसर शुभम अग्रवाल, पेट्रोलियम कंझर्व्हेशन रिसर्च असोसिएशन ( पीसीआरए) चे एस. एम. जाधव, सागर हरदास आदी मान्यवर उपस्थित होते.
यानंतर समाजप्रबोधनासाठी रॅली काढण्यात आली. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन हिंदूस्थान पेट्रोलियम कॉर्पोरेशन लिमिटेडचे वरिष्ठ अधिकारी परितोष दवंडे यांनी केले, तर अमित बॅनर्जी यांनी आभार मानले. (वार्ताहर)