उत्तर मध्य महाराष्ट्रात कमी दाबाचे क्षेत्र

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 5, 2021 05:00 AM2021-02-05T05:00:36+5:302021-02-05T05:00:36+5:30

लोकमत न्यूज नेटवर्क पुणे : उत्तर मध्य महाराष्ट्र व लगतच्या भागात द्रोणीय स्थिती निर्माण झाली आहे. तसेच उत्तर केरळपासून ...

Low pressure area in North Central Maharashtra | उत्तर मध्य महाराष्ट्रात कमी दाबाचे क्षेत्र

उत्तर मध्य महाराष्ट्रात कमी दाबाचे क्षेत्र

Next

लोकमत न्यूज नेटवर्क

पुणे : उत्तर मध्य महाराष्ट्र व लगतच्या भागात द्रोणीय स्थिती निर्माण झाली आहे. तसेच उत्तर केरळपासून मध्य महाराषट्रापर्यंत कमी दाबाचे क्षेत्र तयार झाला आहे. त्याचा परिणाम राज्यातील थंडीवर होणार असून फेब्रुवारीच्या पहिल्या आठवड्यात राज्यातील तापमानात वाढ होण्याची शक्यता आहे. रविवारी राज्यात सर्वात कमी किमान तापमान गोंदिया येथे ७.५ अंश सेल्सिअस नोंदविले गेले आहे.

राज्यात विदभार्च्या तुरळक भागांत किमान तापमानात सरासरीच्या तुलनेत लक्षणीय घट झाली आहे. मराठवाड्याच्या काही भागांत आणि मध्य महाराष्ट्राच्या तुरळक भागात किमान तापमानात लक्षणीय वाढ झाली आहे.

मध्य महाराष्ट्र व विदर्भातील काही भागांत ४ व ५ फेब्रुवारीदरम्यान आकाश अंशत: ढगाळ राहण्याची शक्यता आहे. पुण्यात १ ते ५ फेब्रुवारीदरम्यान आकाश अंशत: ढगाळ राहण्याची शक्यता आहे. त्यामुळे किमान तापमानात वाढ होऊन ते १७ अंश सेल्सिअसपर्यंत जाण्याची शक्यता आहे. फेब्रुवारीच्या पहिल्या आठवड्यानंतर राज्यात पुन्हा किमान तापमानात घट होण्याची शक्यता आहे.

राज्यातील प्रमुख शहरातील किमान

तापमान (अंश सेल्सिअस) : पुणे १३.१, लोहगाव १५, जळगाव ९, कोल्हापूर १८, महाबळेश्वर १४.४, मालेगाव १२, नाशिक ११.३, सांगली १६.४, सातारा १५.१, सोलापूर १९.१, मुंबई १९.४, सांताक्रूझ १७, अलिबाग १४.२, रत्नागिरी १८.७, पणजी २०.१, डहाणू १७, उस्मानाबाद १६, औरंगाबाद १४.२, परभणी १५.६, नांदेड १८, बीड १६.४, अकोला १२.६, अमरावती १३.३, बुलढाणा १४, ब्रह्मपुरी १०.७, चंद्रपूर १३.४, गोंदिया ७.५, नागपूर १०.३, वाशिम १५.४, वर्धा १२.

Web Title: Low pressure area in North Central Maharashtra

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.