कोकणासह संपूर्ण राज्यात ४ दिवस 'वरुणराजा' बरसणार ; हवामान विभागाचा इशारा

By ऑनलाइन लोकमत | Published: April 10, 2021 08:15 PM2021-04-10T20:15:18+5:302021-04-10T20:15:38+5:30

विदर्भापासून दक्षिण तामिळनाडुपर्यंत कमी दाबाचे क्षेत्र

The low pressure area from Vidarbha to South Tamil Nadu received 4 days of rain in the entire state including Konkan | कोकणासह संपूर्ण राज्यात ४ दिवस 'वरुणराजा' बरसणार ; हवामान विभागाचा इशारा

कोकणासह संपूर्ण राज्यात ४ दिवस 'वरुणराजा' बरसणार ; हवामान विभागाचा इशारा

googlenewsNext
ठळक मुद्देअनेक ठिकाणी सायंकाळनंतर हलका पाऊस

पुणे : विदर्भ ते दक्षिण तामिळनाडूच्या अंतर्गत भागापर्यंत उत्तर -दक्षिण कमी दाबाचे क्षेत्र आता दक्षिण पश्चिम मध्य प्रदेश व लगतचा भाग ते कॉमोरीन क्षेत्र व लगतच्या भागापर्यंत मराठवाडा, मध्य महाराष्ट्र, कर्नाटक व केरळमार्गे पसरले आहे. त्यामुळे संपूर्ण महाराष्ट्रासह दक्षिणेतील अनेक राज्यात अवकाळी पावसाचे संकट आले आहे.

दक्षिण कोकण, गोव्यासह मध्य महाराष्ट्र, मराठवाडा व विदर्भात पुढील ४ दिवस पावसाचे राहणार असल्याचा इशारा हवामान विभागाने दिला आहे. राज्यात सर्वाधिक कमाल तापमान अकोला येथे ४१.९ अंश सेल्सिअस तर सर्वात कमी किमान तापमान महाबळेश्वर येथे १९.४ अंश सेल्सिअस नोंदविले गेले.
गेल्या २४ तासात मध्य महाराष्ट्र, विदर्भात तुरळक ठिकाणी पाऊस पडला. शनिवारी दिवसभरात राज्यात सर्व ठिकाणी आकाश ढगाळ होते. सायंकाळी साउेपाच वाजेपर्यंत सातारा १३, महाबळेश्वर १, ब्रम्हपुरी १० मिमी पावसाची नोंद झाली आहे. 

दक्षिण कोकणातील सिंधुदुर्ग, रत्नागिरी जिल्ह्यात वादळी वार्‍यासह पुढील ४ दिवस पावसाची शक्यता आहे. अहमदनगर, पुणे, कोल्हापूर, सातारा, सांगली, सोलापूर जिल्ह्यातही वादळी वारे, मेघगर्जनेसह पावसाची शक्यता असून जालना, परभणी, बीड, हिंगोली, उस्मानाबाद, लातूर, नांदेड जिल्ह्यात सर्वत्र मेघगर्जनेसह सोसायट्याचा वारा वाहण्याची शक्यता असल्याचा इशारा हवामान विभागाने दिला आहे. 
.........
पुणे शहरात शनिवारी दिवसभर आकाश ढगाळ होते. सायंकाळी आकाशात ढगांची गर्दी केली. त्यानंतर दुपारी ४ नंतर शहराच्या अनेक भागात हलक्या पावसाला सुरुवात झाली. लॉकडाऊनमुळे रस्त्यांवर गर्दी नसल्याने लोकांची धावपळ झाली नाही. अनेकांनी या पावसाचा घरात बसूनच आनंद लुटला. पुढील ६ दिवस आकाश ढगाळ राहून सायंकाळनंतर मेघगर्जनेसह, विजांचा कडकडाट होण्याची शक्यता असल्याचा अंदाज हवामान विभागाने वर्तविला आहे.

Web Title: The low pressure area from Vidarbha to South Tamil Nadu received 4 days of rain in the entire state including Konkan

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.