नसरापूर - गळतीमुळे भोर तालुक्यातील कांबरे येथील गिºहे वस्तीजवळील पाझर तलाव कोरडा पडला आहे. मागील काही महिन्यांपासून लागलेल्या गळतीमुळे तलावात एकही थेंब पाणी शिल्लक राहिले नाही. त्यामुळे तलावाच्या ओलिताखाली शेती करणाºया शेतकºयांची अडचण झाली आहे. पिकाला पाणी द्यायचे कोठून? असा प्रश्न निर्माण झाला आहे.शेतीसाठी व पिण्याच्या पाण्याच्या प्रश्न आ वासून उभा राहिला आहे. त्याकरिता कांबरे येथील ग्रामस्थांनी हा बंधारा ताबडतोब दुरुस्त करून या बंधाºयातून होणारी पाण्याची गळती थांबवावी, अशी मागणी केली आहे. या मागणीकरिता अनेक दिवसांपासून सरकारदरबारी खेटे घालूनही शेतकºयांच्या पदरी काहीही पडत नाही. शासनाकडून कोणत्याही प्रकारची ठोस उपाययोजना केली गेलेली नाही. सन २००२मधील दुष्काळात या टंचाईग्रस्त कांबरे (भोर)येथील गिºहेवस्तीजवळील पाझर तलाव जिल्हा परिषदेच्या माध्यमातून बांधण्यात आला होता. या बंधाºयात आता पूर्ण गळती झाल्याने संपूर्ण तलावात खडखडाट आहे. तातडीने दुरुस्ती करण्याची मागणी ग्रामस्थांनी केली आहे.शेतकºयांसाठी जीवनदायी असलेला पाझर तलाव कोरडा पडला असल्याने दुष्काळाची छाया कांबरे गावावर पसरली आहे. येथील शेतकºयांच्या या पाझर तलावासाठी मोठ्या प्रमाणात जमीन संपादन होऊनही कांबरेकरांच्या पदरी निराशाच पडली आली आहे. तलावाच्या पाण्यावरच शेतकºयांची पिके, जनावरांचा पाणीप्रश्न अवलंबून आहे.पाणीगळतीमुळे शेतकरीवर्ग हतबल झाला आहे. या वेळी कृषी उत्पन्न समितीचे माजी संचालक उत्तम कोंढाळकर, उपसरपंच विशाल कोंढाळकर, बाबासो गिºहे, रामदास गिºहे, सुभान यादव, रघुनाथ यादव, तानाजी पवार, दादासो कोंढाळकर, श्रीरंग कोंढाळकर, मारुती नाईलकर, बाळासाहेब सुतार, दशरथ गिºहे पाझर तलाव गळती थांबविण्याची मागणी करीत आहेत. कांबरे येथील पाझर तलावाची गळती लवकरात लवकर न काढल्यास ग्रामस्थांनी आंदोलन करणार असल्याचा इशारा दिला आहे.या तलावाची पाणी साठवण क्षमता मोठी असली, तरी पावसाळ्यानंतर मात्र पाण्याची आवश्यकता असते त्याच वेळी हा पाझर तलाव कोरडा पडला आहे. पाझर तलावाकरिता या गावातील प्रत्येक शेतकºयाने आपली जमीन देऊ केली आहे.शेतकºयांनी त्यांनी जमीन जरी बंधाºयाकरिता दिली असली तरी मात्र या बंधाºयाचा पिकांसाठी काहीही उपयोग झालेला नाही. स्थानिकांनी जिल्हा परिषद व आमदारांकडे वेळोवेळी पाठपुरावा केलेला आहे.कांबरे येथील शेतजमीन डोंगरात व डोंगरकिनारी असल्याने हलकी व खडकाळ प्रकारातील आहे. डोंगराशेजारी वसलेल्या वाड्यावस्ती, शेती व पिण्याचा पाण्याचा प्रश्न या तलावामुळे सुटू शकणार आहे. हा पाझर तलाव पूर्ण क्षमतेने भरल्यास या भागातील शेतकºयांच्या जमिनीला या तलावातील पाण्याचा फार मोठा फायदा होईल.जिल्हा परिषदेच्या माध्यमातून सन २००९मध्ये गळती दुरुस्तीचे काम करण्यात आले होते. तरीही या तलावाची गळती बंद होऊ शकली नाही. दोन वर्षांपासून पाझर तलावाची तळभागातूनच गळती झाल्याने सध्या तलाव कोरडा पडला आहे.कांबरे येथील पाझर तलाव हा राज्य सरकारच्या स्थानिकस्तर योजनेतून बांधला आहे. त्याची दुरुस्ती जिल्हा परिषदेच्या माध्यमातून झाली होती. या मूळच्या कामातील दोष असेल तर तरीही दुरुस्तीनंतर गळती थांबत नाही. या दुरुस्तीला पाच वर्षे पूर्ण झाली असतील तरच पुन्हा दुरुस्तीचे नियोजन करता येईल. अद्याप ग्रामस्थांची आमच्याकडे मागणी आलेली नाही. त्यांनी मागणी केल्यास त्याचा विचार केला जाईल.- वाय. आर. हसनाळे,अभियंता, छोटे पाटबंधारे विभाग
गळतीमुळे कांबरे तलाव पडला कोरडा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 06, 2018 3:01 AM