कोरोना प्रतिबंधक साहित्य विक्री व्यवसायात गुंतवणुकीचे आमिष : २२ लाखांची फसवणूक
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 25, 2021 04:16 AM2021-08-25T04:16:40+5:302021-08-25T04:16:40+5:30
पुणे : कोरोना प्रतिबंधक साहित्य विक्री व्यवसाय, तसेच मुंबई महापालिकेस साहित्य पुरवण्याचे काम मिळवून देण्याच्या आमिषाने एका व्यावसयिकाची २२ ...
पुणे : कोरोना प्रतिबंधक साहित्य विक्री व्यवसाय, तसेच मुंबई महापालिकेस साहित्य पुरवण्याचे काम मिळवून देण्याच्या आमिषाने एका व्यावसयिकाची २२ लाखांची फसवणूक करण्यात आल्याची घटना समोर आली आहे.
याबाबत व्यावसायिकाने मार्केट यार्ड पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यावरून बाँबे ट्रेडर्सचे मालकासह तिघांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. टाळेबंदीत तक्रारदार व्यावसायिकाचा व्यवसाय बंद झाला होता. बाँबे ट्रेडर्सचे मालक तक्रारदार व्यावसायिकाच्या ओळखीचे आहेत. कोरोना प्रतिबंधक साहित्याला मागणी असून मुंबई महापालिकेस साहित्याचा पुरवठा करण्याचे काम मिळवून देण्याचे आमिष व्यावसायिकाला दाखविण्यात आले होते. व्यावसायिकाने बाँबे ट्रेडर्सच्या मालकाच्या खात्यात ऑनलाइन पद्धतीने वेळोवेळी २२ लाख ४४ हजार रुपये जमा केले. पैसे घेतल्यानंतर साहित्य पुरवठ्याचे काम मिळवून न देण्यात आल्याने व्यावसायिकाने नुकतीच पोलिसांकडे तक्रार दिली. पोलीस निरीक्षक सविता ढमढेरे तपास करत आहेत.