उस्ताद तौफिक कुरेशी यांना मधुरिता सारंग सन्मान

By Admin | Published: January 14, 2017 03:30 AM2017-01-14T03:30:57+5:302017-01-14T03:30:57+5:30

कला क्षेत्रातील प्रतिष्ठेचा मानला जाणारा दहावा मधुरिता सारंग सन्मान प्रख्यात संगीतकार, तालवाद्यांचे जग बदलून टाकणारे

Madhurita Sarang honored by Ustad Taufiq Qureshi | उस्ताद तौफिक कुरेशी यांना मधुरिता सारंग सन्मान

उस्ताद तौफिक कुरेशी यांना मधुरिता सारंग सन्मान

googlenewsNext

पुणे : कला क्षेत्रातील प्रतिष्ठेचा मानला जाणारा दहावा मधुरिता सारंग सन्मान प्रख्यात संगीतकार, तालवाद्यांचे जग बदलून टाकणारे उस्ताद तौफिक कुरेशी यांना प्रदान केला जाणार आहे. येत्या १९ जानेवारी रोजी सायंकाळी ६.३0 वाजता यशवंतराव चव्हाण नाट्यगृहात हा पुरस्कार प्रदान सोहळा होणार असून, प्रख्यात हिंदी साहित्यिक अशोक वाजपेयी या कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे असणार आहेत.
पुरस्कार समितीच्या समन्वयक आणि मधुरिता सारंग स्कूल आॅफ परफॉर्मिंग आर्ट्सच्या संचालक अर्चना संजय यांनी ही माहिती दिली.
कथक नृत्यगुरू पं. राजेंद्र गंगाणी आणि उस्ताद तौफिक कुरेशी यांची एकल आणि युगल प्रस्तुती हे दहाव्या मधुरिता सारंग सन्मान प्रदान सोहळ्याचे आकर्षण असणार आहे. या पुरस्कार प्रदान सोहळ्याच्या निमित्ताने साहित्य-संस्कृती-संगीत-नृत्य-नाट्य अशी दशकपूर्ती मैफल रंगणार आहे. तसेच, त्यानंतर २० जानेवारी रोजी देशभरातील उदयोन्मुख कलावंतांची कथक प्रस्तुती त्याच सभागृहात सायंकाळी ६.३0 वाजता असणार आहे.

Web Title: Madhurita Sarang honored by Ustad Taufiq Qureshi

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.