मध्य महाराष्ट्र, विदर्भात पाऊस
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 16, 2018 11:43 PM2018-05-16T23:43:55+5:302018-05-16T23:43:55+5:30
पुणे : मध्य महाराष्ट्र व विदर्भात तुरळक ठिकाणी हलक्या स्वरुपाचा पाऊस झाला आहे़ पुढील २४ तासात मध्य महाराष्ट्र व विदर्भात तुरळक ठिकाणी मेघगर्जनेसह पाऊस पडण्याची शक्यता आहे़ तर मराठवाडा व विदर्भात एक दोन ठिकाणी उष्णतेची लाट येण्याची शक्यता असल्याचा इशारा हवामान विभागाने दिला आहे़ रविवारी सकाळी संपलेल्या २४ तासात राज्यात अकोला ०़५, कोल्हापूर ०़७ मिमी पावसाची नोंद झाली होती़ राज्यात अकोला येथे सर्वाधिक कमाल ४३़७ अंश सेल्सिअस तापमानाची नोंद झाली़ उत्तर भारतात अनेक ठिकाणी सध्या पाऊस होत आहे़ पंजाब, जम्मू, काश्मीर, छत्तीसगड, कर्नाटकाचा अंतर्गत भाग, केरळ येथील बहुतांश ठिकाणी पाऊस झाला़ विदर्भ, हरियाना, हिमाचल प्रदेश येथे तुरळक ठिकाणी पाऊस झाला़ पुढील २४ तासात ओडिशा येथे मुसळधार पाऊस पडण्याची शक्यता आहे़ उत्तराखंड, हिमाचल प्रदेश, जम्मू काश्मीर उत्तरप्रदेश, झारखंड, पश्चिम बंगाल, दिल्ली, तेलंगणा, रायलसिमा, तामिळनाडू दक्षिण कर्नाटक येथे मेघगर्जनेसह पावसाची शक्यता आहे़ रविवारी सायंकाळी पुणे शहरात पावसाने जोरदार हजेरी लावली़ तसेच येवला येथेही पाऊस झाला़ राज्यात पुढील २४ तासात मध्य महाराष्ट्र व विदर्भात तुरळक ठिकाणी मेघगर्जनेसह पावसाची शक्यता आहे़ १५ ते १७ मे दरम्यान विदर्भात तुरळक ठिकाणी पाऊस होऊ शकतो़ १४ मे रोजी मराठवाडा व विदर्भात एक दोन ठिकाणी उष्णतेची लाट येण्याची शक्यता आहे़ तर १५ ते १७ मे दरम्यान विदर्भात एक दोन ठिकाणी उष्णतेची लाट येण्याची शक्यता असल्याचा इशारा हवामान विभागाने दिला आहे़ राज्यातील प्रमुख शहरांमधील कमाल तापमान (अंश सेल्सिअस): पुणे ३९़४, लोहगाव ४०़३, अहमदनगर ४४, जळगाव ४३़२, कोल्हापूर ३६़१, महाबळेश्वर ३३, मालेगाव ४२़२, नाशिक ३९़२, सांगली ३६़६, सातारा ३९़२, सोलापूर ४१़१, मुंबई ३४, सातांक्रुझ ३४़६, अलिबाग ३५, रत्नागिरी ३४़४, पणजी ३४़१, डहाणू ३५, उस्मानाबाद ४०़४, औरंगाबाद ४०़६, परभणी ४३़६, नांदेड ४१़५, बीड ४२़२, अकोला ४३़७, अमरावती ४३़४, बुलढाणा ४०़६, ब्रम्हपुरी ४३़५, चंद्रपूर ४३़४, गोंदिया ४३़२, नागपूर ४२़९, वर्धा ४३़५, यवतमाळ ४२़५़