पुणे : येरवड्यातील महाराष्ट्र हौसिंग बोर्ड कॉलनीचा पुनर्विकास करण्यास शासनाने मान्यता दिली आहे. त्यामुळे येथील मोडकळीस आलेल्या इमारतीत राहणा-या रहिवाशांना दिलासा मिळणार आहे.मंत्रालयात आज गृहनिर्माण मंत्री प्रकाश मेहता यांच्यासमवेत वडगाव शेरी मतदारसंघाचे आमदार जगदिश मुळीक यांची बैठक झाली. या वसाहतीतील इमारती मोडकळीस आलेल्या आहेत. त्यामुळे पुनर्विकास करण्याची गरज असल्याचे शिष्टमंडळाच्या वतीने सांगण्यात आले. बैठकीस पुणे म्हाडाचे उपकार्यकारी अधिकारी अजय सावंत, राजकुमार बाफना ,संयुक्त संघाचे राजकुमार खोपकर, नामदेवराव घाडगे ,दिलीप म्हस्के, विलास भोसले, बाबूशेठ वैष्णव, रामचंद्र देशमुख, सुनिल गायकवाड, अजय सावंत, अर्चना कुचेकर, आत्माराम टेमकर, निरंजन मराठे, संंध्या शिंदे, गजानन जागडे आदी पदाधीकारी व गाळेधारक उपस्थित होते.
महाराष्ट्र हौसिंग बोर्ड कॉलनीचा पुनर्विकास
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 03, 2017 3:23 AM