पुणे : कर्नाटकच्या किनारपट्टीपासून छत्तीसगडपर्यंत द्रोणीय स्थिती निर्माण झाली असून, त्यामुळे आर्द्रता वाढली आहे. त्याचवेळी उत्तरेकडील थंड वाऱ्याचा जोर वाढला असल्याने किमान तापमानात घट होत आहे. २० जानेवारीनंतर आणखी घट होण्याची शक्यता आहे.
पुण्यातील किमान तापमान १० अंश सेल्सिअसच्या खाली जाण्याची शक्यता आहे. गुरुवारी सकाळी पाषाण येथे १०.९ अंश सेल्सिअस, तर शिवाजीनगर येथे ११.५ अंश सेल्सिअस, तर लोणी काळभोर येथे सर्वांत कमी ९.७ अंश सेल्सिअस किमान तापमानाची नोंद झाली आहे.
राज्यात सर्वांत कमी किमान तापमान जळगाव येथे १०.३ अंश सेल्सिअस इतकी नोंद झाली होती. पुणे परिसरात येत्या आठवड्यात आकाश मुख्यत: निरभ्र राहण्याची शक्यता असून, सकाळी धुके पडण्याची शक्यता आहे. किमान तापमानात हळूहळू घट होण्याची शक्यता आहे.