महास्वच्छता व महाश्रमदान अभियानची पिंपरी बुद्रुकमध्ये सुरुवात
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 21, 2021 04:12 AM2021-09-21T04:12:46+5:302021-09-21T04:12:46+5:30
पिंपरी बुद्रुकच्या सरपंच ज्योती श्रीकांत बोडके, माजी सरपंच श्रीकांत बोडके यांच्या हस्ते या अभियानाचे उद्घाटन झाले. यावेळी पिंपरी बुद्रुक ...
पिंपरी बुद्रुकच्या सरपंच ज्योती श्रीकांत बोडके, माजी सरपंच श्रीकांत बोडके यांच्या हस्ते या अभियानाचे उद्घाटन झाले. यावेळी पिंपरी बुद्रुक ग्रामपंचायतीच्या माध्यमातून सरपंच, उपसरपंच, सर्व ग्रामपंचायत सदस्य व गावातील ग्रामस्थ यांच्या माध्यमातून सार्वजनिक स्वच्छता, रस्ते, शाळा, अंगणवाडी परिसर, गावातही चौका-चौकात साफसफाई, कठार सफाई आणि सुका व ओला कचरा वेगळा-वेगळा जमा करण्यात आला
गावासाठी स्वच्छतेचे महत्त्व, प्लास्टिक बंदी, प्लास्टिकपासून दुष्परिणाम, ओला कचरा, खराब पडलेला सुका कचरा यापासून होणारे दुष्परिणाम याबाबत माहिती पंचायत समिती विस्ताराधिकारी युनूस शेख, केंद्रप्रमुख सुनिता कदम (मॅडम) ग्रामसेवक गणेश लंबाते यांनी दिली. प्लास्टिक बंदीला पर्याय म्हणून कापडी पिशव्या देण्याचे आश्वासन माजी सरपंच श्रीकांत बोडके यांनी दिले. यावेळी सरपंच ज्योती बोडके, उपसरपंच अनुराधा गायकवाड, ग्रामपंचायत सर्वच सदस्य संतोष सुतार, पांडूदादा बोडके, चेअरमन सुदर्शन बोडके, संत गाडगेबाबा अभियानचे अध्यक्ष बाळासाहेब घाडगे, बबन बोडके, नामदेव बोडके, अशोक बोडके, प्रभाकर बोडके, शहाजी आण्णा बोडके, आनंता बोडके, लालासाहेब बोडके, रामचंद्र लावंड, दत्तूनाना बोडके, पोपट बोडके, तुकाराम मगर, सोमनाथ बोडके, प्रवीण बोडके, बप्पा मगर, राजेंद्र लावंड, भाऊराव बोडके, महेश सुतार, नबीलाल शेख, अनिल गायकवाड, जगुमामा मोहिते, शहाजी सूळ, सतीश बोडके, तालुका उपाध्यक्ष प्रशांत बोडके, देवीदास बोडके, बाळू आतार, आदी उपस्थित होते.
---------------------------------------
फोटो क्रमांक - २० नीरा नसरिंगपूर महास्वच्छता अभियान
फोटो ओळी : पिंपरी बुद्रुक गाव स्वच्छता अभियानास सुरुवात करीत असताना सरपंच ज्योती बोडके व ग्रामस्थ.