महात्मा जोतिबा फुले द्रष्टे अर्थतज्ज्ञ - डॉ. सिद्धार्थ धेंडे
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 13, 2018 03:00 AM2018-06-13T03:00:30+5:302018-06-13T03:00:30+5:30
महात्मा फुले आणि सावित्रीबाई फुले यांनी १५० वर्षांपूर्वी जनसामान्यांचा विकास शिक्षणाशिवाय होणार नाही, म्हणून शाळा काढल्या. तसेच देशातील पहिली मुलींची शाळा भिडेवाड्यात सुरू केली.
पुणे - महात्मा फुले आणि सावित्रीबाई फुले यांनी १५० वर्षांपूर्वी जनसामान्यांचा विकास शिक्षणाशिवाय होणार नाही, म्हणून शाळा काढल्या. तसेच देशातील पहिली मुलींची शाळा भिडेवाड्यात सुरू केली. हे कार्य करताना जनसामान्यांचा शेती हाच मुख्य व्यवसाय असल्याने त्यांच्या अडचणी व ध्येय आणि व्यथा इंग्रजदरबारी मांडल्या. शेतकऱ्याचे आसूड व गुलामगिरी हे पुस्तक लिहून प्रबोधन केले. त्यामुळे महात्मा फुले हे द्रष्टे अर्थतज्ज्ञ होते, असे मत उपमहापौर डॉ. सिद्धार्थ धेंडे यांनी व्यक्त केले.
फुले शाहू आंबेडकर एज्युकेशनल अँड सोशल फाउंडेशन तर्फे ‘बँकिंग २०१८’ परीक्षेतील गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार समारंभ ज्ञानज्योती सावित्रीबाई फुले सभागृहात पार पडला. यावेळी माजी एसबीआय अधिकारी लोकेश शर्मा, डॉ पुष्पक पांडव, रघुनाथ ढोक उपस्थित होते.
डॉ. धेंडे म्हणाले, ‘‘नोकरी करताना स्वयंकेंद्रित काम न करता समाजाभिमुख काम करा.
तरच देशाचा आर्थिक विकास
होईल. यामुळे आपला देश
महासत्ता बनेल.’’
या वेळी विद्यार्थ्यांसह २६० विद्यार्थ्यांना बॅग व ज्ञानज्योती सावित्रीबाई फुले ग्रंथ भेट देण्यात आले. कौस्तुभ महाडिक यांनी सूत्रसंचालन केले. अमेय तरवटे
यांनी आभार मानले.
राष्ट्रीय ओबीसी महासंघ, आकाश ढोक, क्षितिज ढोक यांचे या कार्यक्रमाला सहकार्य
लाभले.
प्रामाणिकपणे काम करा
ढोक म्हणाले, ‘‘तासाची नोकरी करताना इतर छंद लक्षात घेऊन आपली प्रगती करा. योग्य प्रकारे आर्थिक नियोजन करून
स्वत:चा विकास कराच, सोबत समाजाचे देणे म्हणून नावलौकिक होईल, असे काम करा. अभ्यास करा. खेड्या-पाड्यात राजकारणी
मंडळींपेक्षा आपणास जास्त मानसन्मान मिळतो, त्यामुळे प्रामाणिकपणे काम करा.’’