माहेश्वरी फुटबॉल लीग : गॅरॉन ग्लॅडिएटर्स, व्ही नाईन रॉकर्स चॅम्पियन!
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 30, 2018 03:42 AM2018-01-30T03:42:11+5:302018-01-30T03:42:26+5:30
महेश सेवा संघ युवा समितीतर्फे आयोजित माहेश्वरी फुटबॉल लीगच्या दुसºया सत्रात किड्स गटामध्ये व्ही नाईन रॉकर्स, तर खुल्या गटामध्ये गॅरॉन ग्लॅडिएटर्स संघाने विजेतेपदाला गवसणी घातली.
पुणे : महेश सेवा संघ युवा समितीतर्फे आयोजित माहेश्वरी फुटबॉल लीगच्या दुसºया सत्रात किड्स गटामध्ये व्ही नाईन रॉकर्स, तर खुल्या गटामध्ये गॅरॉन ग्लॅडिएटर्स संघाने विजेतेपदाला गवसणी घातली.
‘लोकमत’ माध्यम प्रायोजक असलेली ही स्पर्धा गरवारे महाविद्यालयाजवळील सेंट्रल मॉलमध्ये झाली. यशोधन असोसिएट्स या स्पर्धेचे मुख्य प्रायोजक होते. रविवारी झालेल्या दोन्ही गटांतील अंतिम लढती चांगल्याच रंगल्या. पेनल्टी शूटआऊटमध्ये आकृती चॅम्पियन्सचा ३-२ने पराभव करून व्ही नाईन रॉकर्सने किड्स गटाचे विजेतेपद प्राप्त केले. खुल्या गटामध्येही पेनल्टी शूटआऊटपर्यंत ताणल्या गेलेल्या निर्णायक लढतीत गॅरॉन ग्लॅडिएटर्सने पारिजात फायटर्सवर ४-३ने सरशी साधून अजिंक्यपदाचा मान मिळविला.
किड्स गटामध्ये निर्धारित वेळेत दोन्ही संघ १-१ने बरोबरीत होते. पेनल्टी शूटआऊटमध्ये रॉकर्सतर्फे ईशान इंदानी आणि प्रथमेश लखोटिया यांनी केलेले गोल निर्णायक ठरले. शूट आऊटमध्ये चॅम्पियन्सतर्फे श्रवण राठी यालाच गोल करता आला. या लढतीत पीयूष सोमाणी ‘सामनावीर’ ठरला.
खुल्या गटातील अंतिम फेरीत निर्धारित वेळेमध्ये ग्लॅडिएटर्स आणि फायटर्स यांच्यात २-२ अशी बरोबरी होती. पेनल्टी शूटआऊटमध्ये पुष्कर राठी आणि अर्पित मंत्री यांनी गोल करून ग्लॅडिएटर्सच्या ४-३ अशा विजेतेपदावर शिक्कामोर्तब केले. निर्धारित वेळेत २ गोल करणारा मोहित नावंदर सामन्याचा मानकरी ठरला. तिसºया स्थानासाठी झालेल्या लढतीत गीत गनर्सने प्रावा डायमण्ड्सवर २-१ने मात केली.
स्पर्धेचे पारितोषिक वितरण यशोधन असोसिएट्सचे प्रमुख सुरेश नावंदर यांच्या हस्ते झाले. या वेळी शैलेश मालू, श्याम राठी, प्रवीण भरडिया, जवाहर बाहेती, महेश सेवा संघ युवा समितीचे अध्यक्ष कृष्णकांत लखोटिया, संजय बिहानी, लाहोटी होस्टेलचे अध्यक्ष राजेंद्र असावा, प्रकल्पप्रमुख अनूप करवा, सीए नंदकिशोर मालानी, शंतनू नावंदर, जुगलकिशोर तापडिया, विजय राठी, कोहिनूर इंदानी उपस्थित होते. स्पर्धेच्या यशासाठी निधी भुतडा, कल्पा लड्डा, आशिष मंत्री, सचिन मुंदडा, ललित भट्टड, धीरज मुंदडा, मुरारी मुंदडा, रवींद्र काबरा, संजय धूत, विनोद मुंदडा, आश्विन मुंदडा, दिलीप बूब, सचिन राठी, विशाल राठी, अमित भुतडा, अक्षय लड्डा यांनी परिश्रम घेतले.
नीरज लखोटिया आणि अभय जाजू यांनी सूत्रसंचालन केले. महेश सेवा संघ युवा समितीचे सचिव सागर करवा यांनी आभार मानले.
निकाल :
- खुला गट : अंतिम फेरी : गॅरॉन ग्लॅडिएटर्स : ४ (निर्धारित वेळेत मोहित नावंदर २, पेनल्टी शूटआऊटमध्ये पुष्कर राठी, अर्पित मंत्री) विवि पारिजात फायटर्स : ३ (निर्धारित वेळेत सिद्धांत नावंदर १, यश सिकची १, पेनल्टी शूटआऊटमध्ये अमित राठी). तिसºया स्थानासाठी लढत : गीत गनर्स : २ (यश दरक १, अंकित लोहिया १) विवि प्रावा डायमण्ड्स : १ (तेजस सोनी).
- किड्स गट : अंतिम फेरी : व्ही नाईन रॉकर्स : ३ (निर्धारित वेळेत प्रथमेश लखोटिया १, पेनल्टी शूटआऊटमध्ये ईशान इंदानी, प्रथमेश लखोटिया) विवि आकृती चॅम्पियन्स : २ (निर्धारित वेळेत श्रवण राठी, पेनल्टी शूटआऊटमध्ये चिरायू सारडा).
वैयक्तिक पारितोषिके : अंतिम सामन्याचा मानकरी : पीयूष सोमाणी (किड्स गट), मोहित नावंदर (खुला गट). गोल्डन बूट : प्रथमेश लखोटिया (किड्स गट, ८ गोल), मोहित नावंदर (खुला गट, ९ गोल). गोल्डन ग्लोव्ह्ज : अरमान इंदानी (किड्स गट), रजत दरक (खुला गट). प्लेअर आॅफ द टूर्नामेंट : श्रवण राठी (किड्स गट), वेदांत करवा (खुला गट).