मुख्य सूत्रधाराचे धागेदोरे कर्नाटकपर्यंत

By admin | Published: May 28, 2016 04:21 AM2016-05-28T04:21:07+5:302016-05-28T04:21:07+5:30

बारामती तालुक्यातील तरडोलीनजीक धायगुडेवस्ती येथील अल्पवयीन मुलीची पूजेसाठी मागणी करणाऱ्या मुख्य सूत्रधाराचे धागेदोरे कर्नाटकापर्यंत पोहोचले आहेत. पोलीस त्याच्या मागावर

The main commander is in Karnataka | मुख्य सूत्रधाराचे धागेदोरे कर्नाटकपर्यंत

मुख्य सूत्रधाराचे धागेदोरे कर्नाटकपर्यंत

Next

मोरगाव : बारामती तालुक्यातील तरडोलीनजीक धायगुडेवस्ती येथील अल्पवयीन मुलीची पूजेसाठी मागणी करणाऱ्या मुख्य सूत्रधाराचे धागेदोरे कर्नाटकापर्यंत पोहोचले आहेत. पोलीस त्याच्या मागावर आहेत, तर या प्रकरणी अटक करण्यात आलेल्या सहा जणांना दि. ३० मेपर्यंत पोलीस कोठडी देण्यात आली आहे.
दरम्यान, पूजाप्रकरणी वडगाव निंबाळकर पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक सतीश शिंदे यांच्याकडून तपास काढून घेण्यात आला आहे.
तरडोली येथील मुलीची अघोरी पूजा व पैशांचा पाऊस पाडण्यासाठी सहा फूट उंच मुलीची मागणी करण्यात आली होती.
याचा सूत्रधार पुणे शहरात काही दिवसांपूर्वी वास्तव्यास होता. मात्र, हा प्रकार उघडकीस आल्यानंतर कर्नाटकातील मूळ गावी असल्याची चर्चा सध्या या भागात आहे. शुक्रवारी (दि.२७) संबंधित अल्पवयीन मुलगी व तिच्या आईस संबंधित प्रकरणाची चौकशी करण्यासाठी वडगाव निंबाळकर पोलिसांनी बोलावले होते. या वेळी संबंधित प्रकार सांगताना मुलीला अश्रू अनावर झाले.
वडगाव निंबाळकर पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक सतीश शिंदे यांच्याकडून तपास काढून घेण्यात आला आहे. बारामती शहर पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक विजय जाधव यांच्याकडे हा तपास
देण्यात आला आहे. उपविभागीय पोलीस अधिकारी बापू बांगर यांनी तपासाची सूत्रे जाधव यांच्याकडे दि. २५ मे रोजी सोपविली.
अल्पवयीन मुलीस अघोरी पूजा करण्यासाठी मागणी केली जात असल्याबाबतची तक्रार वडगाव पोलिसांकडे मुलीच्या काकांनी व पालकांनी केली होती. तक्रार दाखल केल्यानंतरदेखील गुन्ह्यातील सर्व आरोपींना दि. २४ मे रोजीच केवळ जबाब घेऊन सोडल्याने, या भागात तीव्र संताप व्यक्तहोत होता. याबाबत दिरंगाई केल्याने शिंदे यांच्याकडील तपास काढून घेण्यात आला आहे.
(वार्ताहर)

आणखी प्रकार उजेडात येणार : आरोपींना ३0 मेपर्यंत पोलीस कोठडी
1मुख्य आरोपी सध्या पुणे येथे राहत आहे. तो कारवाईच्या भीतीने कर्नाटकाकडे गेला असल्याची माहिती उजेडात येत आहे. यामुळे बारामती तालुक्यात अघोरी पूजा व पैशांचा पाऊस चर्चेचा विषय बनला आहे. कर्नाटकाकडे पलायन केलेला मुख्य आरोपी ताब्यात आल्यास, आणखी इतर प्रकार उजेडात येण्याची शक्यता आहे.

2दरम्यान, अटक करण्यात आलेले आरोपी नाना मारुती कोळेकर, दिगंबर बापूराव भापकर, महादेव बाजीराव भापकर, भाऊसाहेब गेनबा सोनवलकर, पोपट शिवराम नाळे, विकास दादाराम मोहिते या सहा जणांना बारामती न्याय दंडाधिकारी यांच्यासमोर आज उभे केले होते. त्यांना दि.३० पर्यंत पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे.

Web Title: The main commander is in Karnataka

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.