पुणे पोलीस दलात मोठे फेरबदल

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 29, 2018 05:03 AM2018-07-29T05:03:39+5:302018-07-29T05:03:51+5:30

पुणे शहर पोलीस दलात एकाच वेळी सहआयुक्तांसह ८ पोलीस उपायुक्तांच्या बदल्या करण्यात आल्या असून, ग्रामीण पोलीस दलातील अधीक्षक व अपर अधीक्षक यांची एकाच वेळी बदली झाली आहे.

 Major reshuffle of Pune police force | पुणे पोलीस दलात मोठे फेरबदल

पुणे पोलीस दलात मोठे फेरबदल

Next

पुणे : पुणे शहर पोलीस दलात एकाच वेळी सहआयुक्तांसह ८ पोलीस उपायुक्तांच्या बदल्या करण्यात आल्या असून, ग्रामीण पोलीस दलातील अधीक्षक व अपर अधीक्षक यांची एकाच वेळी बदली झाली आहे़ नव्याने स्थापन झालेल्या पिंपरी-चिंचवड पोलीस आयुक्तालयासाठी अपर पोलीस आयुक्तांसह पोलीस उपायुक्तांची नियुक्ती करण्यात आली आहे़ तसेच, पुणे शहरातील चारही परिमंडळांतील पोलीस उपायुक्तांची बदली करण्यात आल्याने आगामी काळात येणाऱ्या दहीहंडी, गणेशोत्सवात शहर पोलिसांची कसोटी लागणार आहे़
नक्षलग्रस्त भागात काम केलेले रवींद्र कदम यांची पुन्हा नागपूर शहरात सहपोलीस आयुक्त म्हणून बदली करण्यात आली असून त्यांच्या जागी नागपूरचे सहआयुक्त शिवाजीराव बोडसे यांची नियुक्ती केली आहे़ ग्रामीण पोलीस अधीक्षक सुवेझ हक यांची बढतीवर मुंबईत पोलीस उपमहानिरीक्षक म्हणून दहशतवाद विरोधी पथकात नियुक्ती केली आहे़ विशेष शाखेचे उपायुक्त संजय बाविस्कर यांची बढतीवर अमरावती पोलीस आयुक्त म्हणून बदली
केली आहे़ तसेच, बी. जी. गायकर यांची बढतीवर नागपूर शहरात अपर पोलीस आयुक्त (गुन्हे)पदी आणि राज्य राखीव पोलीस दलाच्या गट क्रमांक १ चे समादेशक सुनील फुलारी यांची बढतीवर पुण्यात अपर पोलीस आयुक्त उत्तर विभागात नियुक्ती केली आहे.
पुढील २ महिन्यांत महत्त्वाच्या असलेल्या दहीहंडी आणि गणेशोत्सव या सणांमध्ये शहरातील परिमंडळ १ आणि २ च्या पोलीस उपायुक्तांची महत्त्वाची भूमिका असते.  परिमंडळ १ चे उपायुक्त डॉ. बसवराज तेली यांचील पोलीस अधीक्षक लोहमार्ग पुणे आणि परिमंडळ २ चे डॉ. प्रवीण मुंडे यांची धुळे पोलीस अधीक्षक म्हणून बदली झाली आहे.
पिंपरी-चिंचवडसाठी परिमंडळ ३चे उपायुक्त गणेश शिंदे यांची मुंबई पोलीस उपायुक्तपदी आणि परिमंडळ ४चे उपायुक्त दीपक साकोरे यांची मुंबईत राज्य गुप्तवार्ता विभागाचे उपायुक्त म्हणून बदली झाली आहे़ एकाच वेळी चारही परिमंडळांच्या पोलीस उपायुक्तांची बदली होण्याची ही पहिलीच वेळ आहे़
गुन्हे शाखेचे उपायुक्त पंकज डहाणे (पोलीस अधीक्षक, सीआयडी, नवी मुंबई), डी़ एस़ कुलकर्णी प्रकरणात महत्त्वाची भूमिका असणारे आर्थिक गुन्हे शाखेचे उपायुक्त सुधीर हिरेमठ यांची मुंबईत पोलीस महासंचालक कार्यालयात सहायक पोलीस महानिरीक्षकपदी बदली झाली आहे़

पुणे शहर सहआयुक्तपदी शिवाजीराव बोडखे
पुणे शहरात सह आयुक्तपदी नागपूरचे शिवाजीराव बोडखे यांनी नियुक्ती झाली आहे़ बोडखे हे मूळचे श्रीगोंदे तालुक्यातील पारगाव सुद्रीकचे राहणार असून त्यांनी पुण्यातील कृषी महाविद्यालयातून पदवी घेतली आहे़ १९८४मध्ये त्यांची
पोलीस उपअधीक्षक म्हणून नियुक्ती करण्यात आली होती़ २०१७ पासून ते नागपूरमध्ये सहपोलीस आयुक्त म्हणून काम पाहत होते़ नक्षलविरोधी अभियान राबविण्यात त्यांना चांगले यश आले़ गुणवत्तापूर्ण सेवेबद्दल राष्ट्रपतीच्या पोलीस पदकाने त्यांचा गौरव करण्यात आला आहे़

पुणे शहरात आलेल्या पोलीस उपायुक्तांमध्ये बच्चन सिंग (अप्पर अधीक्षक, जळगाव), मंगेश शिंदे (अप्पर अधीक्षक, नांदेड), प्रकाश संपतराव गायकवाड (अप्पर अधीक्षक, सिंधुदुर्ग), स्मार्तना एस. पाटील (उपायुक्त, नागपूर शहर), सुहास पी. बावचे (नागपूर शहर), प्रसाद अक्कानवरू (सीआयडी ), शिरीष सरदेशपांडे (सह आयुक्त, अन्न व औषध प्रशासन, मुंबई ), तेजस्वी सातपुते (अप्पर अधीक्षक, पुणे ग्रामीण ते उपायुक्त) यांचा समावेश आहे़

पिंपरी-चिंचवड पोलीस आयुक्तालयासाठी अपर पोलीस आयुक्त म्हणून पुणे व पिंपरीची माहिती असणारे आणि अनेक वर्षे येथे काम केल्याचा अनुभव असलेले मकरंद रानडे यांची नियुक्ती करण्यात आली आहे़ तसेच उपायुक्त म्हणून नम्रता पाटील, विनायक ढाकणे यांची नियुक्ती केली गेली आहे़ त्यामुळे येत्या १५ आॅगस्ट रोजी पिंपरी-चिंचवड पोलीस आयुक्तालय कार्यरत करण्याच्या दृष्टीने घोषणा होण्याची शक्यता निर्माण झाली आहे़

ग्रामीण पोलीस अधीक्षकपदी सातारा येथील अधीक्षक संदीप पाटील यांची, तर अपर अधीक्षकपदी मुंबईतील राज्य गुप्तवार्ताचे उपायुक्त संदीप जाधव यांची नियुक्ती करण्यात आली आहे़ राज्य राखीव पोलीस दलाचे विशेष पोलीस महानिरीक्षक डॉ़ सुरेशकुमार मेकला यांची नवी मुंबईचे सहआयुक्तपदी नियुक्ती करण्यात आली आहे़

पुणे शहरात उपायुक्त म्हणून काम केलेले अरविंद चावरिया यांची हिंगोली अधीक्षकपदावरून राज्य राखीव पोलीस दलाच्या गट क्ऱ १ चे समादेशक म्हणून, तर धुळे येथील अधीक्षक एम़ रामकुमार यांची गट क्ऱ २ चे समादेशक म्हणून बदली करण्यात आली आहे़

अमरावती शहराचे पोलीस आयुक्त डी़ वाय. मंडलिक यांची सीआयडीमध्ये पोलीस उपमहानिरीक्षकपदी बदली करण्यात आली आहे़

नागपूर शहर पोलीस उपायुक्त रवींद्रसिंह परदेशी यांची पुण्यात दहशतवाद विरोधी पथकात पोलीस अधीक्षकपदी नियुक्ती करण्यात आली आहे.

पुणे शहर व पिंपरी-चिंचवड आणि ग्रामीण पोलीस दलातील इतक्या वरिष्ठ अधिकाºयांची एकाच दिवशी बदली होण्याची ही पहिलीच वेळ आहे.

बढतीसाठी राज्यातील काही उपायुक्तांनी मॅटमध्ये धाव घेतली होती़ मॅटने त्यांच्या बाजूने निकाल दिल्यानंतर सार्वत्रिक बदल्यांमध्ये त्यांना बढती देण्याचे निश्चित करण्यात आले होते़ त्यानुसार पुणे शहरात संजय बाविस्कर, बी़ जी़ गायकर, राज्य राखीव पोलीस दलाच्या गट क्ऱ १ चे समादेशक सुनील फुलारी, ग्रामीण अधीक्षक सुवेझ हक यांच्यासह १२ अधिकाºयांना बढती देण्यात आली आहे़

पुण्यातील चारही परिमंडळांच्या उपायुक्तांची बदली होण्याची ही पहिलीच वेळ.

पुण्यात नियुक्ती
शिवाजीराव बोडखे, सुनील फुलारी, बच्चन सिंग, प्रसाद अक्कानवरू, शिरीष सरदेशपांडे, तेजस्वी सातपुते, प्रकाश गायकवाड, स्मार्तना पाटील, सुहास बावचे, मंगेश शिंदे; पिंपरी-चिंचवडसाठी मकरंद रानडे, नम्रता पाटील, विनायक ढाकणे, ग्रामीण अधीक्षकपदी संदीप पाटील व संदीप जाधव अपर अधीक्षकपदी.

पुण्यातून बदली
रवींद्र कदम, संजय बाविस्कर, बी़ जी़ गायकर, सुवेझ हक, दीपक साकोरे, गणेश शिंदे, पकंज डहाणे, सुधीर हिरेमठ, डॉ़ प्रवीण मुंडे व डॉ़ बसवराज तेली.

Web Title:  Major reshuffle of Pune police force

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.