लावणी महोत्सवाने जिंकली मने

By Admin | Published: September 25, 2015 12:58 AM2015-09-25T00:58:39+5:302015-09-25T00:58:39+5:30

लावणीसम्राज्ञी माया खुटेगावकर, अर्चना जावळेकर, संगीता लाखे, स्वाती दसवडकर यांच्या लावण्यांनी भोसरी कला क्रीडा मंचाच्या वतीने आयोजित भोसरी महोत्सव २०१५चा समारोप झाला.

Manavane won by the Lavani festival | लावणी महोत्सवाने जिंकली मने

लावणी महोत्सवाने जिंकली मने

googlenewsNext

भोसरी : लावणीसम्राज्ञी माया खुटेगावकर, अर्चना जावळेकर, संगीता लाखे, स्वाती दसवडकर यांच्या लावण्यांनी भोसरी कला क्रीडा मंचाच्या वतीने आयोजित भोसरी महोत्सव २०१५चा समारोप झाला.
कै. अंकुशराव लांडगे नाट्यगृहात आयोजित केलेल्या भोसरी महोत्सव २०१५मध्ये रांगोळी स्पर्धा, भजन स्पर्धा, नृत्य स्पर्धा आणि मिस्टर अ‍ॅण्ड मिसेस स्पर्धेत पारितोषिक पटकावलेल्या विजेत्यांचा रोख पारितोषिके, स्मृतिचिन्ह व प्रमाणपत्र देऊन गौरविले.
ज्येष्ठ नेते बाळासाहेब गव्हाणे यांच्या हस्ते भजन स्पर्धेतील विजेत्यांना, नगरसेवक अजित गव्हाणे यांच्या हस्ते व माजी नगरसेविका सुनंदा फुगे यांच्या हस्ते नृत्य स्पर्धेतील विजेत्यांना आणि माया खुटेगावकर यांच्या हस्ते रांगोळी स्पर्धेतील विजेत्यांना पारितोषिके देण्यात आली.
मिस्टर अ‍ॅण्ड मिस भोसरी या स्पर्धेत प्रथम रोहन खंदेरा, संस्कृती दीक्षित, द्वितीय क्रमांक निखिल भागवत, पूजा पिल्लई, तृतीय क्रमांक रितेश लखन, रूपाली पाटील यांनी पारितोषिक पटकावले.
या वेळी महोत्सवाचे अध्यक्ष नगरसेवक अ‍ॅड. नितीन लांडगे, अजित गव्हाणे, माजी नगरसेविका सुनंदा फुगे, ज्येष्ठ नेते बाळासाहेब गव्हाणे, शिवसेनेचे माजी शहरप्रमुख बाजीराव लांडे, पवना बँकेचे उपाध्यक्ष जयनाथ काटे, भरत लांडगे, सुनील लांडगे, संदीप राक्षे, किरण लांडगे, राजशेखर डोळस, श्याम लांडगे, निवृत्ती फुगे, नंदू लोंढे, गौरी लोंढे, राजश्री जुन्नरकर, सुनील गव्हाणे, भानुदास फुगे, विजय लांडगे, बाळासाहेब शिंदे, संजय बेंडे, संजय बोरा, नितीन शिंदे, संजय जगदाळे आदी उपस्थित होते.
(वार्ताहर)

Web Title: Manavane won by the Lavani festival

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.