बारामतीमध्ये १४०० रुपयांना आंब्याची पेटी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 2, 2018 03:13 AM2018-04-02T03:13:44+5:302018-04-02T03:13:44+5:30
बाजारात आंब्याचा सुगंध दरवळला की उन्हाळ्याची चाहूल तीव्रतेने जाणवते. वाढत्या असह्य झालेल्या उन्हाच्या झळा अस्वस्थ करतात. याच वेळी बाजारात दरवळणारा आंब्याचा सुगंध सुखावून टाकतो. बारामती शहरातदेखील गेल्या काही दिवसांपासून अांब्याचा सुगंध दरवळू लागला आहे. मात्र, हा सुगंध अद्यापही सर्वसामान्यांच्या आवाक्याबाहेरच आहे. शहरातील बाजारात १४०० रुपयांना दोन डझन किमतीची आंब्याची पेटी विक्रीसाठी उपलब्ध आहे.
बारामती - बाजारात आंब्याचा सुगंध दरवळला की उन्हाळ्याची चाहूल तीव्रतेने जाणवते. वाढत्या असह्य झालेल्या उन्हाच्या झळा अस्वस्थ करतात. याच वेळी बाजारात दरवळणारा आंब्याचा सुगंध सुखावून टाकतो. बारामती शहरातदेखील गेल्या काही दिवसांपासून अांब्याचा सुगंध दरवळू लागला आहे. मात्र, हा सुगंध अद्यापही सर्वसामान्यांच्या आवाक्याबाहेरच आहे. शहरातील बाजारात १४०० रुपयांना दोन डझन किमतीची आंब्याची पेटी विक्रीसाठी उपलब्ध आहे.
शहरात सध्या रस्त्यावर ठिकठिकाणी चौकात आंब्याची पेटी घेऊन बसलेले परप्रांतीय विक्रेते बारामतीकरांचे लक्ष वेधून घेत आहेत. त्यांच्याकडे असणाऱ्या पेट्यांमध्ये पिवळेधमक आंब्याच्या दराची चौकशी करण्याचा मोह सर्वांनाच होत असल्याचे चित्र आहे. मात्र, चौकशी केल्यानंतर आंब्याचे दर ऐकून सर्वांचा भ्रमनिरास होतो. १२०० ते १४०० रुपये आंब्याच्या पेटीचा दर सांगण्यात येत आहे. त्यामुळे बाजारात विक्रीसाठी असलेल्या आंब्याला महाग दरामुळे ग्राहक नसल्याचे विक्रेत्यांनी सांगितले. बारामती शहरात रत्नागिरी हापूस, पायरी, तोतापुरी, कलमी आंबा, गावठी आंब्याला विशेष मागणी असते. अक्षयतृतीयेपर्यंत आंब्याचे दर सर्वसामान्यांच्या आवाक्यात येतात.
बारामतीमध्ये विक्रीसाठी असणाºया आंब्याला नैसर्गिक सुगंध नाही. हा आंबा कृत्रिम पद्धतीने पिकविला गेलेला नाही. गवतामध्ये नैसर्गिक पद्धतीने पिकविल्याचा दावा येथील परप्रांतीय आंबाविक्रेत्याने केला आहे. मात्र, नागरिकांच्या आरोग्याचा प्रश्न असल्याने या आंब्याची तपासणी करण्याची मागणी नागरिकांच्या वतीने होत आहे. कृत्रिम पद्धतीने हानिकारक रसायनांचा वापर करुन पिकविलेल्या आंब्याची विक्री करणारांवर कारवाई करावी, अशी मागणी होत आहे.