पुणे : सध्या उत्सवांचे दिवस असल्याने सर्वत्र धामधूम सुरू आहे. त्यातच गणेशोत्सव तोंडावर आल्याने गणेश मंडळांची लगबग देखील दिसून येत आहे. गणेशोत्सवातील एक मुख्य बाब म्हणजे, मिरवणुकीदरम्यान वाजवले जाणारे डीजे. डीजेच्या कर्कश्श आवाजामुळे लहान मुलांसह ज्येष्ठांना प्रचंड त्रास सहन करावा लागतो. त्यामुळे डीजे वाजवणे बंद झाले पाहिजे अशी मागणी दरवर्षी जोर धरत असते. अनेक डीजे चालक नियमानुसार आवाज न ठेवता मोठ्या आवाजात तो वाजवतात. यामुळे अनेकांवर गुन्हे देखील दाखल होतात.
डीजेचा आवाज किती?
पोलिसांनी काढलेल्या एका परिपत्रकात डीजेच्या आवाजाची पातळी ४० डेसिबलपेक्षा कमी ठेवण्याची सूचना केली होती. प्रत्यक्षात अनेक डीजे चालक ही मर्यादा सर्रास ओलांडतात.
किती आवाजाला शहरात परवानगी?
काही डीजे चालक ७० डेसिबलने गाणी वाजवत असल्याचे पोलिसांमार्फत सिद्ध झाले आहे. शहरात गणेशोत्सवादरम्यान डीजेला पोलिसांनी परवागनी दिली असली, तरी आवाजाची मर्यादा ४० डेसिबलपेक्षाही कमी असावी, असा नियम आहे.
पोलिसांची परवानगी आहे का ?
दरवर्षी गणेशोत्सवाच्या परवानगीसाठी ज्या-ज्या परवानग्या गरजेच्या असतात त्यातच डीजेची परवानगी देखील देण्यात येते. यंदाच्या गणेशोत्सवासंदर्भात अजून कोणतीही नियमावली समोर आलेली नाही.
ह्वदयरोग्यांना, लहान मुलांना त्रास
पुण्यातील तज्ज्ञांच्या म्हणण्यानुसार तीव्र आवाजात डीजे वाजवणे अत्यंत चुकीचे आहे. दोन गाण्यांनंतर १५ ते २० मिनिटांची परवानगी घेणे आवश्यक असताना कर्कश्श आवाजाचा सतत मारा केला जातो. यामुळे कानांसह मेंदुला देखील ईजा होण्याचा धोका अधिक असतो. तसेच, ज्येष्ठ नागरिकांना तर हा आवाज सहन होण्यापलीकडे असल्याने त्यांचाही विचार करणे गरजेचे असल्याचे मत त्यांनी व्यक्त केले.