राज्य शासनाच्या गाढवपणामुळे मराठा आरक्षण रद्द; ५ जूनपासून राज्यभर मोर्चे काढणार : विनायक मेटे
By ऑनलाइन लोकमत | Published: May 24, 2021 02:38 PM2021-05-24T14:38:53+5:302021-05-24T14:39:31+5:30
मराठा आरक्षणासाठी येत्या ५ जूनपासून मराठा समाज राज्यभर मोर्चे काढणार आहेत.आणि यावेळी हे मोर्चे मूक नाहीतर बोलके असणार : विनायक मेटे
पुणे : राज्य शासनाच्या गाढवपणामुळे मराठा समाजाचे आरक्षण रद्द झाले. याविरोधात आम्ही येत्या ५ जूनपासून मोर्चे काढणार आहोत. हे मूक नाहीतर बोलके मोर्चे असणार आहे. आणि हे सर्व मोर्चे कोणत्याही एका संघटनेचे नसून संपूर्ण मराठा समाजाचे असणार आहेत अशी माहिती शिवसंग्राम पक्षाचे अध्यक्ष व आमदार विनायक मेटे यांनी दिली आहे.
पुण्यात विनायक मेटे यांनी पत्रकारांशी संवाद साधला. यावेळी मेटे यांनी मराठा आरक्षणावरून राज्य सरकारवर टीकेची झोड उडवली. मेटे म्हणाले, मराठा आरक्षण घालवण्यात मंत्री अशोक चव्हाण यांचा हात आहे. मंत्री विजय वडेट्टीवार यांना ओबीसींचा नेता होण्याची घाई झाली आहे.मात्र, नाना पटोले आणि वडेट्टीवार यांनी ठरवायचे आहे नेमका कोण ओबीसींचा होता होणार आहे. तसेच छत्रपती संभाजीराजे यांचे सध्या काम चांगले आहे. त्यांनी वेगळी काही भूमिका घेतल्यावर मग त्यावर भाष्य करू असेही मेटे यांनी यावेळी सांगितले.
सारथीला स्वतःची जागा मिळावी म्हणून अजित पवारांचे प्रयत्न...
सारथी संस्थेत गेल्या एक-दीड वर्षांपासून २४१ विद्यार्थ्यांना पीएच.डी साठीचे अनुदान मिळाले नाही, त्यामुळे आजच्या बैठकीत ते देण्यासाठी चर्चा झाली. येत्या १ जूनला सारथी संचालकांच्या बैठकीत विद्यार्थ्यांचे गुणांकन तपासून फेलोशिप मानधन देण्यात येणार आहे. तसेच दोन वर्षांत पीएच.डी पूर्ण करण्याबाबत विद्यार्थ्यांना बंधनकारक करणार आहे. सारथी संस्थेत सध्या ४-५ कर्मचारी आहेत, पुढील दोन महिन्यांत ते वाढवून ४० अधिकारी आणि कर्मचारी भरणार आहेत.सारथीला स्वतःची जागा मिळावी म्हणून अजित पवार यांनी प्रयत्न केले आहेत. लवकरच या जागेचे प्लॅन तयार करणार आहोत असेही