पुणे : मराठा आंदोलकांचा संयम संपत चालला आहे. ते आता कुणाचे ऐकण्याच्या मन:स्थितीत नाहीत. राज्यकर्त्यांनी त्यांना ३० वर्षे आरक्षणापासून वंचित ठेवले. त्यामुळे आता काहीही करून त्यांना आरक्षण देण्याची जबाबदारी सरकारची आहे. अन्यथा उद्रेक झाल्याशिवाय राहणार नाही. सगळ्यांना थोपवून धरणे माझ्या हातात नाही. पुढील काळात काय होईल याची चिंता शासन, न्यायव्यवस्थेने करावी. सरकारने आंदोलकांना नक्षलवादी होण्यास भाग पाडू नये, असा इशारा खासदार उदयनराजे भोसले यांनी दिला.मराठा समाजाला आरक्षण मिळावे याकरिता त्या मोर्चांना योग्य दिशा आणि भूमिका ठरविण्यासाठी उदयनराजे भोसले यांनी राज्याच्या वेगवेगळ्या जिल्ह्यातील समन्वयकांची मराठा आरक्षण परिषद रविवारी आयोजित केली होती. बैठकीनंतर त्यांनी पत्रकारांशी संवाद साधला.सरकारने एकदाच काय ते सांगावे, देणार असाल तर द्या, नसाल देणार तर तसे सांगा. उद्या लोकांनी न्यायव्यवस्थाच हातात घेतली म्हणजे शासनाला कळेल. आता कुणी ऐकुन घेणार नाही. आयोगाचे कारण सांगून शासन पळवाट काढत आहे.यापूर्वीच्या राजकारण्यांनी काय केले यापेक्षा सत्ताधारी काय निर्णय घेतात हे जास्त महत्त्वाचे आहे. वास्तविक अतिशय शांततेत ५८ मोर्चे काढणाऱ्या मराठा बांधवांना जागतिक शांतता पुरस्कार द्यायला हवा. मात्र शासन त्यांना आरक्षणाची केवळ आश्वासने देत आहे, असे ते म्हणाले.>तरुण ऐकण्याच्याच मन:स्थितीत नाहीतमराठा आरक्षणाला आधीच इतका उशीर झाला आहे़ आता मागासवर्गीय आयोगाचा निकाल विरोधात गेला तर, तरुणांना आवरणे शक्य नाही़ तरुण कोणाचेही ऐकण्याच्या मन:स्थितीत नाहीत, अशी भावना पुण्यात आयोजित मराठा आरक्षण परिषदेत राज्यभरातून आलेल्या समन्वयकांनी व्यक्त केल्या़ आमदार हर्षवर्धन जाधव, डॉ़ बुधाजीराव मुळीक, प्रतापराव बोर्डे, सुरेश पाटील, संजीव देशमुख, शांताराम कुंजीर, बाळासाहेब अमराळे, किशोर चव्हाण, योगेश चव्हाण, संतोष शिंदे, विकास पासलकर आदींनी परिषदेत भावना व्यक्त केली़मराठा आरक्षणाचे नेतृत्व उदयनराजे यांनी करावे, असा ठरावही सर्वसंमतीने मंजूर करण्यात आला़ राज्यातील प्रत्येक जिल्ह्यांमधून ५ ते १० जण या परिषदेला उपस्थित होते़ काही महिला कार्यकर्त्याही उपस्थित होत्या़>आत्महत्या करू नकानेतृत्व करण्यास स्वत: मराठा समाजच सक्षम आहे. प्रश्न नेतृत्वाचा नाही. त्याशिवाय मार्ग गाठता येईल. परिस्थिती हाताबाहेर जाऊ न देता मुख्यमंत्र्यांनी सर्वपक्षीय आमदारांची बैठक तातडीने बोलविण्याची गरज आहे, असे त्यांनी सांगितले. उदयनराजे यांनी आरक्षणाकरिता आत्महत्या न करण्याचे आवाहन केले. सार्वजनिक मालमत्तेचे नुकसान करु नका, कायदा सुव्यवस्था राखा, असे आवाहनही त्यांनी केले.
* उदयनराजेंच्या भाषणातील महत्त्वाचे मुद्दे :-
आरक्षणाबाबत केवळ कागदी घोडे नाचवू नका
हात जोडून विनंती, मराठा आरक्षणाबाबत तोडगा काढा, अन्यथा उद्रेक होईल.30 वर्षांपासून आरक्षणाची चर्चा सुरू आहे, किंती अंत बघणारआरक्षणावरुन सरकार किती दिवस मौन पाळणार. आंदोलकांवर नक्षलवादी होण्याची वेळ आणू नका.आरक्षणावरुन एवढी चर्चा कशासाठी, मी लोकांना कुठल्यो तोंडान थांबवूमराठा आंदोलकांनी मानसिकता राहिली नाही. जी परिस्थिती निर्माण होईल, त्यास सामोरे जाण्याची सरकारने तयारी ठेवावी.
पाहा व्हिडिओ -