शहरं
Join us  
Trending Stories
1
भारताचा जीडीपी कोसळला, दोन वर्षांच्या निच्चांकी पातळीवर; महागाई, वाढलेले व्याजदर कारण
2
महाराष्ट्र निवडणुकीचे आकडे बदलणार...? काँग्रेसनं टाकला मोठा डाव; EC निर्णय घेणार!
3
जितेंद्र आव्हाडांनी घेतली एकनाथ शिंदेंची भेट! राजकीय वर्तुळात चर्चा
4
निकालानंतर मुख्यमंत्र्यांनी किती दिवसांत शपथ घेणे बंधनकारक आहे? काय सांगतो नियम? पाहा...
5
रश्मिका मंदानाने केला 'सामी सामी' वर डान्स, हटके ब्लॅक साडीत दिसतेय हॉट!
6
एकनाथ शिंदे नाही, तर कोण? शिवसेनेतून उपमुख्यमंत्रिपदासाठी 'या' 5 नावांची चर्चा...
7
अजमेर शरीफ वादावरून मेहबूबा मुफ्ती संतापल्या; म्हणाल्या, "आता मुस्लिमांच्या घरात मंदिर शोधतील"
8
Samantha Ruth Prabhu: समंथा रुथ प्रभूच्या वडिलांचं निधन, अभिनेत्रीने शेअर केली भावुक पोस्ट
9
म्हशीमुळे मालकाला भरावा लागला ९ हजार रुपयांचा दंड; असं काय घडलं?
10
तुमचा पगार, पॅकेजच नाही, ऑफिसमध्ये या ९ गोष्टीही बोलू नका; नोकरी करताय तर नक्कीच घ्या हा सल्ला...
11
Ed Sheeran ची पुन्हा भारतात कॉन्सर्ट, ६ शहरांमध्ये घुमणार गायकाचा आवाज; कधी आणि कुठे? वाचा
12
Ananya Panday : चंकी पांडे यांच्या 'या' कृतीने अनन्या पांडे त्रस्त; इन्स्टाग्राम डिलीट करण्याचा दिला सल्ला
13
"तुमचा मित्र हिंदूंना चिरडतोय"; इन्फोसिसच्या माजी सीईओंनी मोहम्मद युनूस यांच्या मित्राला सुनावलं
14
तिढा सुटेना, महायुतीचे नेते पुन्हा दिल्लीला जाणार, का होतोय सत्तास्थापनेस उशीर? 
15
Video: 'सुपरमॅन' कॅच! तुफान वेगाने जाणाऱ्या चेंडूवर फिल्डरने हवेतच घेतली चित्त्यासारखी झेप
16
एकनाथ शिंदे नाराज असल्याची चर्चा; राजकीय गदारोळात उदय सामंतांकडून महत्त्वाचा खुलासा
17
गोंदिया-कोहमारा मार्गावर शिवशाही बसचा भीषण अपघात! ११ जणांचा मृत्यू; मुख्यमंत्र्यांकडून मदत जाहीर
18
"वाढीव मतदानाचे व्हिडीओ चित्रीकरणासह पुरावे सादर करा", नाना पटोलेंचं निवडणूक आयोगाला पत्र
19
"लॉरेन्स बिश्नोईचा जेलमधून शूटर्सना कॉल; म्हणाला, पोलिसांना घाबरु नका, आपल्याकडे वकिलांची फौज"
20
PAN 2.0 नंतर सरकार आता EPFO 3.0 आणण्याच्या विचारात; ATM मधूनच करता येणार 'हे' काम

मराठी ज्ञानभाषा व्हावी : ॲड. देवेंद्र बुट्टे पाटील

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 01, 2021 4:11 AM

हुतात्मा राजगुरू महाविद्यालयात मराठी विभागाच्या वतीने मराठी भाषा गौरव दिनाच्या निमित्ताने आयोजित ‘मोकळे आकाश’ या ई- विशेषांकाच्या प्रकाशन प्रसंगी ...

हुतात्मा राजगुरू महाविद्यालयात मराठी विभागाच्या वतीने मराठी भाषा गौरव दिनाच्या निमित्ताने आयोजित ‘मोकळे आकाश’ या ई- विशेषांकाच्या प्रकाशन प्रसंगी बोलत होते. या वेळी उपाध्यक्ष नानासाहेब टाकळकर, प्राचार्य डॉ. व्ही. डी. कुलकर्णी, उपप्राचार्य डॉ. संजय शिंदे, डॉ. एस. बी. पाटील, प्रा. ए. जी. कुलकर्णी, प्रबंधक कैलास पाचारणे उपस्थित होते. ॲड. देवेंद्र बुट्टे पाटील म्हणाले, की मराठी भाषा ज्ञानभाषा होण्यासाठी इंग्रजीप्रमाणे विज्ञान, तंत्रज्ञान, व्यापार, उद्योग, दळणवळण आणि कायद्याची भाषा म्हणून विकसित व्हायला हवी.

ते म्हणाले, भाषा हे संवादाचे प्रभावी माध्यम असून प्रत्येकाने आपल्या मातृभाषेचा अभिमान बाळगायला हवा. उत्तम मराठी भाषा लिहिता-वाचता येणे हे आनंददायी असते. मराठी भाषा समृद्ध असून मराठी साहित्याची गौरवशाली परंपरा आहे. या परंपरेतील साहित्यानुभव प्रत्येक मराठी जनाने घेण्याची गरज आहे. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर विद्यार्थ्यांनी परीक्षार्थी शिक्षण पद्धतीतून बाहेर पडून ज्ञानात्मक, गुणात्मक स्तर उंचविण्यासाठी स्वयं अध्ययनाला महत्त्व देऊन उपक्रमशीलता वाढवायला हवी, असे आवाहन त्यांनी केले.

मराठी विभागाच्या वतीने मराठी भाषा गौरव दिनाचे औचित्य साधून गुरूवारी (दि.२५) कुसुमाग्रजांच्या कवितांचा ‘काव्यजागर’, शुक्रवारी (दि. २६) डॉ. संजय शिंदे यांच्या ‘समाजमाध्यमांतून मराठीचा प्रचार व प्रसार’ या विषयावर व्याख्यान तर शनिवारी (दि.२७) प्रा. साईनाथ पाचारणे यांनी लेखन कार्यशाळेत विद्यार्थ्यांना ऑनलाइन मार्गदर्शन केले. प्रास्ताविक डॉ. संजय शिंदे यांनी तर आभार डॉ. बाळासाहेब अनुसे यांनी मानले.

फोटो ओळ: मराठी भाषा दिनानिमित्त ‘मोकळे आकाश’ या विशेषांकाचे प्रकाशन करताना संस्थाध्यक्ष ॲड. देवेंद्र बुट्टेपाटील, नानासाहेब टाकळकर व इतर.