मराठा आरक्षण पाठिंब्यासाठी सोमवारी बाजार बंद
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 27, 2018 02:20 AM2018-07-27T02:20:09+5:302018-07-27T02:20:26+5:30
श्री छत्रपती शिवाजी मार्केट यार्ड कामगार युनियनचा निर्णय
पुणे : मराठा मोर्चा व सध्या सुरू असलेल्या वाहतूकदारांच्या संपाला पाठिंबा देण्यासाठी येत्या सोमवारी (दि. ३०) एक दिवसाचे बाजार
बंद आंदोलन करण्याचा निर्णय श्री छत्रपती शिवाजी मार्केट यार्ड कामगार युनियनच्या वतीने गुरुवारी झालेल्या बैठकीत घेण्यात आला.
याबाबत मराठा मोर्चाला पाठिंबा देण्याकरिता श्री छत्रपती शिवाजी मार्केट यार्ड कामगार युनियनच्या कार्यालयात सर्व संघटनांची गुरुवारी (दि. २६) सकाळी ११ वाजता बैठक घेण्यात आली.
या बैठकीत मोर्चाला पाठिंबा देण्यासाठी सोमवारी (दि. ३०) एक दिवसांचा बंद पुकारण्याचा निर्णय घेण्यात आला. बैठकीमधे कामगार युनियनचे अध्यक्ष अमोल चव्हाण, सचिव संतोष नांगरे, खजिनदार विलास थोपटे, तोलणार संघटनेचे अध्यक्ष राजेंद्र चोरघे, सचिव राजेश मोहोळ, हनुमंत बहिरट, महात्मा फुले कामगार संघटनेचे अध्यक्ष अंकुश हारपुडे, अनिल गुळवे, टेम्पो पंचायतचे गणेश जाधव, सुरेश ठक्कर इत्यादी पदाधिकारी उपस्थित होते. या वेळी महाराष्ट्र राज्य माथाडी ट्रान्सपोर्ट आणि जनरल कामगार युनियननेदेखील सदर बंदला पाठिंबा जाहीर केला आहे.