लोकप्रतिनिधींच्या निधीतून उभारणार मार्केट
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 25, 2021 04:10 AM2021-03-25T04:10:19+5:302021-03-25T04:10:19+5:30
लष्कर : शिवाजी मार्केटमधील आगीत पूर्णपणे भस्म झालेले फिश मार्केट लवकरात लवकर पुनः उभारणी करावी यासाठी येथील व्यापारी संघटनेचे ...
लष्कर : शिवाजी मार्केटमधील आगीत पूर्णपणे भस्म झालेले फिश मार्केट लवकरात लवकर पुनः उभारणी करावी यासाठी येथील व्यापारी संघटनेचे अध्यक्ष मंजूर शेख यांनी काँग्रेस शहराध्यक्ष रमेश बागवे, रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया (आठवले) शहराध्यक्ष संजय सोनवणे यांचा नेतृत्वाखाली बोर्डाचे मुख्य कार्यकारी अधिकारी अमित कुमार यांची भेट घेतली.
याप्रसंगी व्यापाऱ्यांच्या शिष्टमंडळाशी चर्चा करताना अमित कुमार म्हणाले की मार्केट पुनः उभारणीसाठी अंदाजे सत्तर ते ऐंशी लाख रुपये खर्च अपेक्षित असून बोर्डाची आर्थिक परिस्थिती खूपच नाजूक असल्याने मार्केट पुनःउभारणी आपण सर्वांनी आमदार, खासदार निधी किंवा इतर निधी उपलब्ध करावा. त्यासंबंधी लागणाऱ्या सर्व प्रशासकीय प्रक्रिया मी पूर्ण करतो. या वेळी शेख यांनी सध्या व्यापाऱ्यांना भेडसावणाऱ्या समस्येबाबत अमित कुमार यांना अवगत करून दिल्या व जळालेला मलबा देखील प्रशासनाने अजून काढला नसल्याने मोठी दुर्गंधी पसरल्याचे सांगितले. आरोग्य अधीक्षक रियाज शेख हे मनुष्यबळ नसल्याचे कारण देत काम करत नाहीत असेही सांगितले.
या वेळी रमेश बागवे यांनी मदत व पुनर्वसन मंत्री विजय वडेट्टीवार यांचा निधी मी उपलब्ध करतो, संजय सोनवणे यांनी केंद्रीय मंत्री रामदास आठवले यांच्या निधीतून पंचवीस लाख लगेच उपलब्ध करून देण्याचे आश्वासन मुख्याधिकारी यांना दिले, तर येथील व्यापारी मंडळाने पुण्यातील सर्व खासदार व आमदार यांच्याकडे निधीसाठी साकडे घालणार असल्याचे सांगितले. आमदार सुनील कांबळे, आमदार, सुनील टिंगरे, आमदार संजय जगताप याना पत्रव्यवहार व्यापाऱ्यांनी केल्याचे सांगितले.
याप्रसंगी शंकर सुर्वे, उपाध्यक्ष शशिकांत परदेशी, उपाध्यक्ष शरद राव, बोराडे सागर, भाऊ वांजळे पाटील , फुरकान शेख, हजी शकील कुरेशी इद्रिस खडके, वाईद भाई युसुफ बागवान व सर्व सभासद उपस्थित होते.
फोटो - लष्कर नावाने आहे.