इंदापूर : विवाहितेवर बलात्कार केल्याच्या आरोपावरून पळसदेवनजीक काळेवाडी नं. १ (ता. इंदापूर) येथील एकावर गुरुवारी (दि. २६) रात्री उशिरा इंदापूर पोलीस ठाण्यात बलात्कारासह दलित अत्याचार प्रतिबंधक कायद्यान्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. अमर तुळशीराम काळे (रा. काळेवाडी नं. १, ता. इंदापूर) असे आरोपीचे नाव आहे. त्याच्या अत्याचारास बळी पडलेली विवाहिता दलित आहे. तिने त्याच्या विरोधात तक्रार दिली आहे. मूळ भांडगाव (ता. इंदापूर) येथील रहिवासी असणारी ही २३ वर्षे वयाची विवाहिता मजुरीसाठी काळेवाडी येथे आलेली आहे. ती नैसर्गिक विधीसाठी गेली होती. या वेळी आरोपीने, ‘तू मला आवडतेस’ असे म्हणून तिचा हात धरून तिच्यावर बळजबरी केली. आपल्या घराच्या पाठीमागे असणाऱ्या पत्र्याच्या शेडमध्ये नेऊन तिच्यावर बलात्कार केला. झाला प्रकार कुणाला सांगितलास तर तुझ्यासह पती व मुलगा यांना जिवंत ठेवणार नाही, अशी धमकी दिली. दि. १४ ते २६ मे दरम्यान हा प्रकार घडल्याचे तक्रारीमध्ये म्हटले आहे. बारामतीचे विभागीय पोलीस अधिकारी बापू बांगर अधिक तपास करीत आहेत. (वार्ताहर)
विवाहितेवर बलात्कारप्रकरणी गुन्हा दाखल
By admin | Published: May 28, 2016 4:17 AM