नारायणगाव येथे गळफास घेऊन विवाहितेची आत्महत्या 

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 21, 2018 05:03 PM2018-03-21T17:03:30+5:302018-03-21T17:03:30+5:30

या विवाहितेचा स्वप्नील गौतम गायकवाड याच्याशी रजिस्टर पद्धतीने ८ महिन्यांपूर्वी विवाह झाला होता.

Married women suicide in Narayangaon | नारायणगाव येथे गळफास घेऊन विवाहितेची आत्महत्या 

नारायणगाव येथे गळफास घेऊन विवाहितेची आत्महत्या 

googlenewsNext
ठळक मुद्देपोलीस ठाण्यात या घटनेची नोंद आकस्मिक मृत्यू अशी करण्यात आली आहे.

नारायणगाव :  नारायणगाव  येथे विवाहितेने गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना घडली.  चैत्राली स्वप्नील गायकवाड (वय २०, रा.हनुमान चौक,नारायणगाव )  या घटनेची माहिती निवृत्ती बाबुराव चव्हाण  (रा.धालेवाडी,ता.जुन्नर ) यांनी नारायणगाव पोलीस ठाण्यात दिली आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार , या विवाहितेचे स्वप्नील गौतम गायकवाड याच्याशी रजिस्टर पद्धतीने ८ महिन्यांपूर्वी विवाह झाला होता. आत्महत्येचे कारण अद्यापही समजू शकलेले नाही. पोलीस ठाण्यात या घटनेची नोंद आकस्मिक मृत्यू अशी करण्यात आली आहे. घटनेचा तपास सहायक पोलीस फौजदार  के.डी.ढमाले करत आहे. 

Web Title: Married women suicide in Narayangaon

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.