ठळक मुद्देपोलीस ठाण्यात या घटनेची नोंद आकस्मिक मृत्यू अशी करण्यात आली आहे.
नारायणगाव : नारायणगाव येथे विवाहितेने गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना घडली. चैत्राली स्वप्नील गायकवाड (वय २०, रा.हनुमान चौक,नारायणगाव ) या घटनेची माहिती निवृत्ती बाबुराव चव्हाण (रा.धालेवाडी,ता.जुन्नर ) यांनी नारायणगाव पोलीस ठाण्यात दिली आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार , या विवाहितेचे स्वप्नील गौतम गायकवाड याच्याशी रजिस्टर पद्धतीने ८ महिन्यांपूर्वी विवाह झाला होता. आत्महत्येचे कारण अद्यापही समजू शकलेले नाही. पोलीस ठाण्यात या घटनेची नोंद आकस्मिक मृत्यू अशी करण्यात आली आहे. घटनेचा तपास सहायक पोलीस फौजदार के.डी.ढमाले करत आहे.