मटका- जुगार अड्यावर छापा अकरा जणांवर गुन्हा दाखल
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 21, 2021 04:10 AM2021-03-21T04:10:27+5:302021-03-21T04:10:27+5:30
लोणी काळभोर : हवेली उपविभागीय पोलीस अधिकारी यांचे पोलीस पथकाने बेकायदा, स्वतःचे फायदयाकरीता कल्याण मटका नावाचा जुगार चालवित असलेल्या ...
लोणी काळभोर : हवेली उपविभागीय पोलीस अधिकारी यांचे पोलीस पथकाने बेकायदा, स्वतःचे फायदयाकरीता कल्याण मटका नावाचा जुगार चालवित असलेल्या चालकासह जुगार खेळत असलेले असे एकून ११ जणांवर महाराष्ट जुगार
कायदा कलमान्वये गुन्हा दाखल केला आहे. सदर ठिकाणी मिळून आलेली मटका खेळण्याची साधने व २८ हजार २९० रूपये किमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.
याप्रकरणी मटका चालवत असलेले बालाजी तुकाराम बेरसेले ( वय ४०, रा. सुतारदरा, कोथरूड), रंगनाथ बाजीराव ढेरे ( वय ३३, रा. ऊरूळी देवाची, ता. हवेली), दत्तात्रय रामचंद्र पवार ( वय ३१, रा. सासवड ता. पुरंदर) यांचेसमवेत मटका खेळणारे दत्तात्रय
गुलाबराव पाटील ( वय ३२ वर्ष, रा. फुरसुंगी ता. हवेली) सतीष जयराम लकडे (वय ३२,रा. यवत ता. दौड ) संतोश पोपट
गोरडे (वय ४० रा. फुरसुंगी ता. हवेली ) ज्ञानेश्वर गणेश कांबळे (वय २८ रा. वडकी ता. हवेली ), विनायक पंढरीनाथ काळे ( वय २२, रा. भेकराईनगर, ता. हवेली), सोमनाथ दत्तात्रय कामठे (वय ४५, रा. फुरसुंगी ता. हवेली ) संतोष चंद्रकांत गायकवाड (वय ४१, रा.वारजे माळवाडी पुणे ) व प्रशांत दशरथ सरोदे (वय ३०, रा. ताडीवाला रोड पुणे ) यांचेवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
हवेली उपविभागीय पोलीस अधिकारी डॉ. सई भोरे - पाटील यांना बातमीदार मार्फत ऊरूळी देवाची गावचे हददीत मंतरवाडी स्मशान भुमीकडे जाणारे रोडेचे कडेला पत्राशेडमध्ये काही इसम कल्याण मटका नावाचे जुगाराचे आकडे घेत आहेत. अशी माहिती मिळाली. याची शहनिशा करण्यासाठी त्यांनी आपल्या पथकातील पोलीस उपनिरीक्षक एम. आर. ईनामदार, पोलीस हवालदार एम. आय. शेख, नितीन कदम व कुदळे यांना पाठवले. सदर पथक ऊरूळी देवाची पोलीस दुरक्षेत्र येथे गेले व तेथील पोलीस हवालदार जे. एस. जाधव, एन. एम. राणे, साळुंके यांना घेऊन ऊरूळी देवाची गावचे हद्दीतील मंतरवाडी स्मशानभुमीकडे जाणारे रोडने गेले असता त्यांना पत्रा शेडमध्ये काही इसम हातात पावती बुक व पेन घेवून आकडे लिहीत असेलेचे व त्यांचे बाजूने इतर लोक उभे राहुन पैसे देवुन चिठ्ठया घेत असल्याचे दिसले. पथकाने सदर ठिकाणी छापा घातला असता ते सर्वजण पळुन जावू लागले त्यांना पाठलाग करून जेरबंद करण्यात आले. पोलीसांनी या ठिकाणावरून कल्याण मटका चे कार्बन पेपरसह बुक, बॉलपेन व रिफील या साहित्यासह २८ हजार २९० रुपये जप्त केले आहेत.