शहरं
Join us  
Trending Stories
1
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 Results Highlights : शरद पवारांच्या राष्ट्रवादीला केवळ 10 जागांवरच मानावं लागलं समाधान; कुठे कोण जिंकलं? बघा संपूर्ण लिस्ट
2
Maharashtra Assembly Vidhan Sabha Election 2024 Result Highlights: PM नरेंद्र मोदींच्या महाराष्ट्रात १० प्रचारसभा; भाजपासह महायुतीचे किती उमेदवार विजयी झाले?
3
नांदेड लोकसभा पोटनिवडणुकीत मोठी उलथापालथ; शेवटच्या फेरीत काँग्रेसने मारली बाजी
4
Maharashtra Assembly Vidhan Sabha Election 2024 Result Highlights: लाडक्या बहिणींची नारीशक्ती, भीमशक्तीमुळे महायुतीचा ऐतिहासिक महाविजय: रामदास आठवले
5
महाराष्ट्रात भाजपने 148 पैकी 132 जागा जिंकल्याच कशा? काँग्रेसने उपस्थित केला प्रश्न...
6
Maharashtra Assembly Vidhan Sabha Election 2024 Result Highlights: “विधानसभा पराभवावर चिंतन करु, जनतेच्या प्रश्नासाठी काँग्रेस काम करत राहील”: नाना पटोले
7
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 Results Highlights : महाराष्ट्रात ओवेसींचं '15 मिनिट'चं राजकारण 'फुस्स'; AIMIM चे 16 पैकी 15 उमेदवार पराभूत
8
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 Results Highlights : बाळासाहेब थोरात, पृथ्वीराज चव्हाण ते नवाब मलिक...; या 17 मोठ्या नेत्यांना चाखावी लागली पराभवाची धूळ...!
9
'माझे परममित्र देवेंद्रजी फडणवीस...', दणदणीत विजयानंतर PM मोदींनी केले अभिनंदन
10
मुस्लिमबहुल मतदारसंघात भाजपचा हिंदू शिलेदार विजयी; विरोधात 11 मुस्लिम उमेदवार...
11
Maharashtra Vidhan Sabha Election Result 2024 Live: आम्ही निर्णय घेण्याचे सर्वाधिकार शिंदेंना दिलेत: दीपक केसरकर यांची माहिती
12
काही लोकांनी दगाफटका करून अस्थिरता निर्माण केली, पण महाराष्ट्राने शिक्षा दिली; मोदींचा घणाघात
13
Maharashtra Assembly Vidhan Sabha Election 2024 Result Highlights: “जनतेचाही विश्वास बसलेला नाही, विधानसभा निकाल अविश्वसनीय, अनाकलनीय व अस्वीकार्ह”: काँग्रेस
14
ओवेसींच्या AIMIM ने महाराष्ट्रात खाते उघडले, 'हा' उमेदवार अवघ्या 75 मतांनी विजयी...
15
महायुतीच्या विजयाने बिहारच्या आगामी निवडणुकीची पायाभरणी केली- चिराग पासवान
16
साकोलीत काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांचा २०८ मतांनी निसटता विजय
17
Sharad Pawar: शरद पवारांच्या बालेकिल्ल्याला सुरुंग; पुणे जिल्ह्यात अवघ्या एका जागेवर तुतारी वाजली, दिग्गज पराभूत!
18
डमी उमेदवारामुळे रोहित पवारांची सीट आलेली धोक्यात; अखेर कर्जत-जामखेडचा निकाल जाहीर...
19
राज ठाकरेंमुळे आदित्य ठाकरेंची आमदारकी वाचली; गेल्यावेळी थेट पाठिंबा, यावेळी...
20
Maharashtra Assembly Vidhan Sabha Election 2024 Result Highlights: महायुतीची त्सुनामी, मविआसह मनसेलाही तडाखा; राज ठाकरेंचे एकाच वाक्यात भाष्य, म्हणाले...

माऊली तुला वंदितो

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 13, 2018 6:55 AM

आईच्या प्रेरणेमुळे कर्तृत्ववान व्यक्तींनी आपल्या क्षेत्रात यशाची भरारी घेतली आहे. आईची कौतुकाची थाप हीच यशाची गुरुकिल्ली आहे. तिच्या प्रेरणेमुळे आमचा विकास झाला. तसेच जीवनात यशही मिळाले. संकटाच्या काळात आईने दिलेला सल्ला आजही उपयोगी ठरतो. तिच्या कृपनेच यशस्वी प्रवास झाला आहे. मातृदिनानिमित्त पिंपरी-चिंचवड शहरातील विविध क्षेत्रांत उल्लेखनीय कार्य केलेल्या कर्तृत्ववान व्यक्तींनी ...

आईच्या प्रेरणेमुळे कर्तृत्ववान व्यक्तींनी आपल्या क्षेत्रात यशाची भरारी घेतली आहे. आईची कौतुकाची थाप हीच यशाची गुरुकिल्ली आहे. तिच्या प्रेरणेमुळे आमचा विकास झाला. तसेच जीवनात यशही मिळाले. संकटाच्या काळात आईने दिलेला सल्ला आजही उपयोगी ठरतो. तिच्या कृपनेच यशस्वी प्रवास झाला आहे. मातृदिनानिमित्त पिंपरी-चिंचवड शहरातील विविध क्षेत्रांत उल्लेखनीय कार्य केलेल्या कर्तृत्ववान व्यक्तींनी आईविषयीच्या भावना ‘लोकमत’शी बोलताना व्यक्त केल्या.आगे बढोची‘ती’चीच प्रेरणासामान्य विद्यार्थी ते आंतरराष्टÑीय कबड्डीपट्टू आणि उत्पादन शुल्क विभागाचे अधिकारी नितीन घुले यांनी आपल्या यशात आईचे योगदान असल्याचे सांगितले. ज्या वेळी मनोबल खचले त्या वेळी नाणीने लढण्याची ताकद दिली, म्हणून उत्तम खेळाडू, उत्तम माणूस घडलो, असे ते आवर्जुन सांगतो.नितीन घुले हे पिंपरी-चिंचवड शहरातील बोपखेलचे रहिवासी आहेत. सामान्य कुटुंबातील तरुणाने कबड्डी खेळात यश संपादन केले आहे. आंतरराष्टÑीय खेळाडू नितीन घुले म्हणाले, ‘‘आई हिराबाई घुले अर्थात आमची नाणी. माझ्यातील खेळाच्या उर्मीस तिने प्रोत्साहन दिले. शाळा महाविद्यालयीन स्तरावर असताना अनेक स्पर्धामध्ये सहभागी झाल्यानंतर अनेकदा अपयश आले. मात्र, त्या वेळी मायेचा आधार, आणि मला लढण्याची प्रेरणा देण्याचे काम आईने केले. सन २००० ची घटना. खेळताना मी जखमी झालो होतो. त्या वेळी खेळ खेळायचे नाही असे मी ठरविले. आॅपरेशन होईपर्यंत आई म्हणाली, तुझी इच्छा नाही ना खेळायची, मग नाही खेळायचे. आॅपरेशन झाले़ मी बरा झालो. पुन्हा स्पर्धा सुरू झाल्या. त्या वेळी ती म्हणाली, चला आता पुन्हा कबड्डी सुरू करायला हवी. खेळायला हवे. असे थांबून कसे चालेल. माझे मनोबल खचले की ती माझ्यात आत्मविश्वास भरत असे. त्यातूनच मी राष्टÑीय आणि आंतरराष्टÑीय स्पर्धांमध्ये यश संपादन करू शकलो़ आजचे यश केवळ तिच्यामुळेच आहे. त्यानंतर २०१२ मध्ये उत्पादन शुल्क विभागात अधीक्षक झालो. कबड्डी खेळात मी यश संपादन केले नसते. तर आज मी अधीक्षक झालो नसतो. आईबरोबरच वडील, भाऊ चेतन यांचेही योगदान मोलाचे आहे.कला परंपरा आईकडूनचक्लासी लूकची अभिनेत्री अर्थात प्रियंका यादव. ‘अगंबाई अरेच्चा’मधून स्टार झालेल्या या अभिनेत्रीने अनेक मराठी आणि हिंदी सिनेमातून आपली ओळख निर्माण केली आहे. अभिनेत्री, दिग्दर्शक आणि निर्माती अशा विविध जबाबदाऱ्या ती पेलत आहे. आपल्या यशाचे श्रेय ती आपल्या आई डॉ. कमल यादव यांना देते.प्रियंका मूळची चिंचवडची. वडील अजित आणि आई डॉ. कमल हे वैद्यकीय क्षेत्रात आहेत. कलेतील यशाचे श्रेय प्रियंका आपल्या आईस देते. प्रियंका म्हणाली, ‘‘माझी आई एक गृहिणी, उत्तम डॉक्टर आणि माझी मार्गदर्शक, मैत्रीण आहे. ती कथक नृत्यांगणा असल्याने कलेचा वारसा तिच्याकडून माझ्यात आला आहे. चित्रपट क्षेत्रात पदार्पण करताना तिला खूप काळजी वाटत होती. सुरुवातीच्या कालखंडात अनेक ठिकाणी आॅडीशन दिल्यानंतर मला खूप कंटाळा येत होता. त्या वेळी तिने मला खूप आधार दिला.मात्र, माझ्यातील आत्मविश्वास तिने पाहिला आणि प्रोत्साहन दिले. खरं सांगू का? आई ही माझी उत्तम परीक्षक आणि मार्गदर्शक आहे. मी काय चांगले करू शकते, माझ्यात काय क्षमता आहे, हे तिला चांगले माहीत आहे. आमच्या कुटुंबाची ती शान आहे. ती घरात नसेल तर आम्हाला करमत नाही. तिने मला चित्रपट सृष्टीत करिअर घडविण्यासाठी प्रोत्साहन दिले़ एकामागून एका चित्रपटात यश मिळत गेले. अगंबाई अरेच्चा, नशिबाची ऐशी तैशी, लेक लाडकी, भैरू पैलवान की जय, जय हो, असा हा अतरंगी असे अनेक चित्रपट गाजले. तर तुझीच रे, हृदयांतरी, हा मी हे मराठी चित्रपट पूर्ण झाले आहेत. माझ्यातील उत्तम कलावंत घडला त्यात आईचे योगदान मोलाचे आहे. त्यामुळेच अभिनय, दिग्दर्शन आणि आता निर्मिती क्षेत्रातही यश मिळविले आहे. ‘चुकलच जरा डॉक्टर’ हा डॉक्टरांवरील हल्ला या विषयावरील कलाकृती पूर्ण झाली आहे. वडिलांनी मला अभ्यासू वृत्ती शिकविली. माझ्यातील कलावंत घडविण्यासाठी आईने दिलेले योगदान अनमोल आहे. तिच्यामुळेच मी कलाक्षेत्रात लौकीक मिळवित आहे.’’कुटुंबाकडून कलेचा वारसायुवा पिढीची आश्वासक गायिका म्हणजेच चिंचवडची सावनी रवींद्र घांगुर्डे होय. उत्तम गायिका, अभिनेत्री म्हणूनही सावनीची ओळख आहे. उत्तम पार्श्वगायिका घडल्याचे श्रेय सावनी आईला देते. कलेचा समृद्ध वारसा असणाºया कुटुंबात सावनी जन्माला आली. वडील डॉ. रवींद्र घांगुर्डे प्रख्यात गायक असून, आई डॉ. वंदना घांगुर्डे ही संगीत रंगभूमीवरील गायिका, अभिनेत्री आहेत.आईबद्दल सावनी म्हणाली, ‘‘आईविषयी बोलायला शब्दही कमी पडतात. आई आपले सर्वस्व असते. मी स्वत:ला भाग्यवान समजते की माझा एका सांगितिक कुटुंबात जन्म झाला. संगीताचे बाळकडू आईवडिलांकडून मिळाले. लहानपणी माझा अभ्यास घेण्यापासून ते कार्यक्रमाला येण्यापर्यंत. पूर्वी पंडित यशवंत देव यांच्याकडे मुंबईला गाणी शिकायचे त्या वेळी ती मला घेऊन जात असे. स्वत:चे करिअर सांभाळून तिने माझ्याकडे दुर्लक्ष केले नाही. संस्कार दिले. स्वत:चे सुख कधीच पाहिले नाही. मला कसं सुख मिळेल यासाठी प्रयत्न केले. आई ही आई नसून गुरू आहे. मी तिच्याकडून खूप गोष्टी शिकले. गाण्यातल्या व्यक्ती म्हणून जगण्यातल्या, सकारात्मक दृष्टिकोन अनेक गोष्टी नकळतपणे, जाणून बुजून शिकविण्यात ती उत्तम अभिनेत्री आहे. तिला पाहून मी मोठी झाले. आता गायिका म्हणून स्वत:ला परफॉरमन्स करावा लागतो. तेव्हा मला माझ्या आईचा परफॉरमन्स आठवतो. प्रत्येक मुलीला वाटते आपली आई ज्या गोष्टी करते, त्या कराव्यात. आपली आई ही आपल्यासाठी सर्वांत मोठा आदर्श असतो. त्यामुळे आईवडिलांनी घडवलंय. या क्षेत्रात आणलंय. फक्त गायिका म्हणून नाही तर चांगला माणूस बनण्याचे संस्कारही दिले आहे.माझी आई ही उत्तम कलाकार आणि त्याचबरोबर उत्तम गृहिणीही आहे. अष्टपैलू व्यक्तिमत्त्व, उत्तम लेखिका, नर्तिका, गायिका, शिक्षिका आहे. तिला शाळेत सर्व मुले आई या नावाने हाक मारतात. गेली ३० वर्षे ती यशस्वी शिक्षिका म्हणून काम पाहते. यशस्वी आघाडीची अभिनेत्री, गायिका आहे. कुठलंही काम करीत असताना घराकडे कधीच दुर्लक्ष केले नाही. अत्यंत जिद्दीची आहे. नाही हा शब्द तिच्या डिरिक्टरीत नाही. कितीही अडचणी आल्या तर त्यातून कसे बाहेर पडायचे, कसे सामोरे जायचे हा संस्कार तिने आम्हाला दिला आहे. नाटक निर्मिती, सेट लावणे, अभिनय अशा सर्व भूमिका ती उत्तमपणे साकारत असते. आम्ही तिला म्हणतो आई तुझ्यात वनमॅन शो असल्याने एकटी लढत असते.ती माझ्यासाठी एक आदर्श आहे. मी तिला कधीही थकलेले पाहिले नाही. सतत कोणत्या ना कोणत्या कामात असते. ४० नंतर पीएच़डी़ पूर्ण केली. हा अभिमान आहे. आई म्हणून, गुरु म्हणून मार्गदर्शक म्हणून माझ्या जीवनात, यशात तिचे स्थान अनमोल आहे. आईसारखे दैवत जगात दुसरे कोणतेच नाही, असे मला वाटते.आई माझे संस्काराचे विद्यापीठअत्यंत कमी कालखंडात कामाची छाप पाडून देशातील विकासात योगदान देणारा अधिकारी म्हणजेच प्राधिकरणातील संकेत शांताराम भोंडवे होय. गेल्या दहा वर्षांच्या कालखंडात आयएएस बनलेल्या संकेत यांनी ३ राष्ट्रपती पुरस्कार, १ पंतप्रधान, ४ राष्ट्रीय, ४ राज्यपाल पारितोषिक जिंकून आपला ठसा कायम ठेवला आहे. आईवडिलांच्या संस्कारामुळे घडल्याचे भोंडवे सांगतात. ‘आई हे संस्काराचे विद्यापीठ आहे’ ते आवर्जून सांगतात.भारतीय प्रशासकीय सेवेत संकेत योगदान देत असून, आईबद्दल बोलताना भाऊक होतात. ते म्हणाले, ‘‘आई हा शब्द खूप समृद्ध आणि सुंदर आहे. ‘आ’ म्हणजे आत्मा, ‘ई’ म्हणजे ईश्वर. आईबद्दल किती आणि काय बोलायचे हा खरा प्रश्न आहे. आईबद्दल खूप लेखकांनी लिहिले. तिच्याबद्दल बोलताना मी नि:शब्द होतो. आम्ही मध्यमवर्गीय कुटुंबातील. वडील शांताराम भोंडवे महापालिकेत तर आई सुमन या दोघांचेही माझ्या यशात योगदान आहे. आईने जे संस्कार केले, घडविले त्यामुळे आम्ही शिकलो. काहीतरी बनू शकलो. चांगला माणूस हो, हा तिचाच संस्कार. माझे संस्काराचे विद्यापीठ आहे. शालेय, महाविद्यालयीन जीवनात तिने आमच्यासाठी खूप कष्ट उपसले. म्हणून आज चांगला अधिकारी बनू शकलो. ती मॅट्रीक उत्तीर्ण झालेली. मी खूप शिकावे, मोठे व्हावे असे तिला वाटायचे. मी आयएएसची सुरुवात २००३ पासून केली आणि २००७ मध्ये यशस्वी झालो. मी आयएएस झालो. याचा आनंद तिला खूप झाला होता. कितीही मोठे झाले तरी आई आणि मातीशी नाळ कायम ठेवा. हे आमच्या कुटुंबातील संस्कार. ३ राष्ट्रपती, १ पंतप्रधान, ४ राष्ट्रीय, ४ राज्यपाल असे विविध पुरस्कार मिळाले. या यशाचे श्रेय आईच्या संस्कारानांच जाते.संकलन : विश्वास मोरे