बैठकीतच बिबट्याने घातला धुमाकूळ

By admin | Published: April 17, 2016 02:52 AM2016-04-17T02:52:42+5:302016-04-17T02:52:42+5:30

बिबट्याच्या सततच्या हल्ल्यामुळे मंगरूळ ग्रामस्थांमध्ये दहशतीचे वातावरण आहे. घटनेनंतर वनविभागाचे कर्मचारी आणि ग्रामस्थांच्या बैठकीदरम्यान दोन बिबटे ग्रामस्थांना घटनास्थळी दिसले.

In the meeting, the leopard came out | बैठकीतच बिबट्याने घातला धुमाकूळ

बैठकीतच बिबट्याने घातला धुमाकूळ

Next

बेल्हा : बिबट्याच्या सततच्या हल्ल्यामुळे मंगरूळ ग्रामस्थांमध्ये दहशतीचे वातावरण आहे. घटनेनंतर वनविभागाचे कर्मचारी आणि ग्रामस्थांच्या बैठकीदरम्यान दोन बिबटे ग्रामस्थांना घटनास्थळी दिसले. यामुळे संतप्त ग्रामस्थांनी ऊस पेटवून दिला.
घटनेनंतर ग्रामस्थांबरोबरच वनखात्याचे उपवनसंरक्षक विठ्ठल धोकटे यांची बैठक चालू असतानाच घराच्या मागील जवळच्या उसातून बिबट्या येथील मक्याच्या शेतात आला व पुन्हा त्याच उसाच्या शेतात बिबट्या गेला. बिबट्याचा हा थरार सर्वच ग्रामस्थांनी प्रत्यक्ष पाहिला. या वेळी संतप्त जमावाने ऊसच पेटवून दिला. यामुळे बिबट्याने लगेचच दुसऱ्या उसाच्या शेतात धूम ठोकली. त्यानंतर पुन्हा दुसरा बिबट्या शेतात आल्याचे ग्रामस्थांनी पाहिले. ग्रामस्थांना हातात काठ्या घेऊन, तसेच त्यांचा आवाज ऐकून बिबट्याने पुन्हा आधी जो बिबट्या ज्या उसाच्या शेतात गेला तिकडे धूम ठोकली. या ठिकाणी दिवसात दोन बिबटे ग्रामस्थांनी प्रत्यक्ष पाहिले. या ठिकाणी वनकर्मचारी कमी व ग्रामस्थ जास्त अशी परिस्थिती होती. या ठिकाणी खासदार शिवाजीराव आढळराव पाटील, अतुल बेनके, आशा बुचके, तहसीलदार आशा होळकर, सरपंच भानुदास खराडे, उपसरपंच चंद्रकांत ढगे, जिल्हा परिषदेचे माजी उपाध्यक्ष पांडुरंग पवार, दूध संघाचे संचालक बाळासाहेब खिल्लारी, अतिरिक्त जिल्हाधिकारी ज्ञानेश्वर खिल्लारी, जिल्हा परिषद सदस्य ज्ञानेश्वर खंडागळे, विघ्नहर साखर कारखान्याचे अध्यक्ष सत्यशील शेरकर, पोलीस निरीक्षक क्रांतिकुमार पाटील, टी. वाय. मुजावर, वल्लभ शेळके, प्रदीप पिंगट, रमेश औटी, प्रवीण खराडे आदी उपस्थित होते.

जुन्नर वनविभागाच्या कार्यक्षेत्रातील या पूर्व भागात गेल्या १५ वर्षांपासून सातत्याने बिबट्याचे हल्ले होत असून पशुगणांसह जीवितहानीही यामध्ये झालेली आहे. बिबटे मानवी वस्तीत येऊ नये, म्हणून वनखात्याकडे कोणत्याही प्रभावी उपाययोजना नसल्याने आजही बिबट्यांचे हल्ले सुरूच असल्याचे दिसून येत आहे.
या घटनेमुळे परिसरात भीतीचे वातावरण पसरले आहे.

बैठक चालू असतानाच घराच्या मागील जवळच्या उसातून बिबट्या येथील मक्याच्या शेतात आला व पुन्हा त्याच उसाच्या शेतात बिबट्या गेला. बिबट्याचा हा थरार सर्वच ग्रामस्थांनी प्रत्यक्ष पाहिला.
या वेळी संतप्त जमावाने ऊसच पेटवून दिला. यामुळे बिबट्याने लगेचच दुसऱ्या उसाच्या शेतात धूम ठोकली.

जुन्नर तालुक्यातून बिबट्या निवारा केंद्रच हलवावे, म्हणजे वारंवार अशा घटना घडणार नाहीत. बिबटे पकडून दुसरीकडे हलवावेत.
- पांडुरंग पवार,
माजी उपाध्यक्ष, जिल्हा परिषद

वनखात्याने बिबट्याला मारण्याची परवानगी घ्यावी, तसेच बिबट्या असलेल्या ठिकाणी सीसीटीव्ही कॅमेरे बसवावेत. पिंजऱ्यांची दुरुस्ती करण्यात यावी.
- भानुदास खराडे,
सरपंच, मंगरुळ

नरभक्षक बिबट्याला शार्प शूटर आणून ठार करणे गरजेचे आहे. बिबट्याचे पाण्याचे व खाण्याचे प्रमाण कमी झाल्यामुळेच वारंवार अशा घटना घडताना दिसत आहेत. बिबट्यांना पकडून इतरत्र हलवावे.
- बाळासाहेब खिल्लारी,
संचालक, दूध संघ

जुन्नर तालुक्यातील पकडलेले बिबटे पुन्हा ह्याच तालुक्यात न सोडता अन्यत्र सोडण्यात यावेत.
- चंद्रकांत ढगे,
उपसरपंच, मंगरुळ

Web Title: In the meeting, the leopard came out

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.