पुणे : लैंगिक अत्याचारामुळे मतिमंद मुलगी गरोदर राहिल्या प्रकरणी शिरुर तालुक्यातील पाबळ येथील मतिमंद मुलांच्या निवासी शाळेचा परवाना अखेर रद्द करण्यात आला. अपंग कल्याण आयुक्त नितीन पाटील यांनी नुकताच तसा आदेश दिला असून, येत्या ३० एप्रिल पासून शाळेचा परवाना संपुष्टात येणार आहे. मुंढवा येथील भटक्या विमुक्त जाती शिक्षण संस्थेच्या वतीने शिरुर येथे मतिमंद मुलांची निवासी शाळा चालविली जाते. येथील एक मतिमंद मुलगी गरोदर असल्याचे गेल्यावर्षी डिसेंबर महिन्यात उघड झाले होते. याप्रकरणी पीडित मुलीच्या पालकांनी शिक्रापूर पोलीस ठाण्यात तक्रार दिली होती. याप्रकरणी बाललैंगिक अत्याचाराचा गुन्हा देखील दाखल झाला आहे.
पाबळ येथील ‘त्या ’ मतिमंद निवासी शाळेचा परवाना रद्द
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 23, 2018 7:52 PM
मुंढवा येथील भटक्या विमुक्त जाती शिक्षण संस्थेच्या वतीने शिरुर येथे मतिमंद मुलांची निवासी शाळा चालविली जाते. येथील एक मतिमंद मुलगी गरोदर असल्याचे गेल्यावर्षी डिसेंबर महिन्यात उघड झाले होते.
ठळक मुद्देलैंगिक अत्याचारामुळे मतिमंद मुलगी राहिली होती गरोदरयेत्या ३० एप्रिल पासून शाळेचा परवाना संपुष्टात येणारअहवालात शाळा व्यवस्थापनाचे कर्मचाºयांवर नियंत्रण नसल्याचे ताशेरे