पबजीच्या व्यसनाने तरुण बनला मानसिक रुग्ण ; प्राण्यांवर हल्ला करण्याचा प्रयत्न 

By ऑनलाइन लोकमत | Published: December 3, 2019 04:51 PM2019-12-03T16:51:09+5:302019-12-03T17:04:39+5:30

आजकाल तरुणांमध्ये पबजी या ऑनलाईन खेळाचं वेड खूप मोठ्या प्रमाणात वाढलं आहे. कुठल्याही गोष्टीची सवय जडली की त्याचे रुपांतर व्यसनात होते. तरुण पिढी मोबाइलच्या विळख्यात अडकत असल्याची चर्चा वारंवार होते आहे.

Mental illness due to PUBG addiction; Attempts to attack the animals | पबजीच्या व्यसनाने तरुण बनला मानसिक रुग्ण ; प्राण्यांवर हल्ला करण्याचा प्रयत्न 

पबजीच्या व्यसनाने तरुण बनला मानसिक रुग्ण ; प्राण्यांवर हल्ला करण्याचा प्रयत्न 

googlenewsNext

पुणे (चाकण) :आजकाल तरुणांमध्ये पबजी या ऑनलाईन खेळाचं वेड खूप मोठ्या प्रमाणात वाढलं आहे. कुठल्याही गोष्टीची सवय जडली की त्याचे रुपांतर व्यसनात होते. तरुण पिढी मोबाइलच्या विळख्यात अडकत असल्याची चर्चा वारंवार होते आहे. पबजी गेमच्या व्यसनाने तर तरुणाईला पुरते अडकवून ठेवले आहे.याच पबजी खेळामुळे चाकणमधील एका तरुणाची मानसिक अवस्था बिघडली असल्याचे समोर आले आहे.संबधित तरुणाला चाकण पोलीस ठाण्यात आणल्यावर तो सतत पबजी गेमबाबतच बडबडत होता.

अजित शिवाजी पवार ( वय.२५,सध्या रा.मेदनकरवाडी, चाकण,मूळ रा. जि.सोलापूर) येथील असून या तरुणाला ( दि.०२)  चाकण पोलीस ठाण्यात आणले त्यावेळी संबधित तरुणाला सतत  पबजी खेळल्याने मानसिक धक्का बसल्याचे त्याच्यासोबत आलेल्या लोकांनी सांगितले. त्यांनी सांगितले की, हा तरुण गेली चार पाच दिवसांपासून आमच्याकडे येत असून,मोबाईल मधील पबजी गेममधील प्रमाणे हावभाव करत असून,गेममधील सारख हातवारे करतो,तसेच पाळीव प्राण्यावर खरेखुरे हल्ले करण्याचा प्रयत्न करत आहे, रस्त्यावरून जाणाऱ्या वाहनांवर हातात लाकडी दांडके घेऊन गोळीबार करत असल्याचे हावभाव करत आहे.संबधित तरुणाईचे मानसिक आरोग्य बिघडले असल्याने यास त्याच्या घरच्यांच्या ताब्यात देण्यात यावे असे पोलिसांना सांगितले आहे.

तंत्रज्ञानाच्या अफाट शोधामुळे संवादाचे अनेक मार्ग खुले झाले. गेल्या दहा वर्षात मोबाइल तंत्रज्ञानात आमूलाग्र बदल झाले. सर्वसामान्यांच्या हातात सर्व सोयींनीयुक्त मोबाइल फोन दिसू लागला. फोरजी युगात आपण पुढारलेले आहोत हे दाखवण्यासाठी प्रत्येक तरुण चांगल्या दर्जाच्या मोबाइलचा आग्रह पालकांकडे धरत आहे. मोबाइलची मागणी पूर्ण न झाल्यास हिंसक होण्याच्या घटनाही घडतात. वर्षभरापूर्वी आलेल्या  पबजी  मोबाइल गेमने तरुणाईला अक्षरशः वेड लावले. तरुण हा गेम मोबाइलवर १२ ते १४ तास खेळतात. त्यामुळे बोट, हात, कोपरा दुखी अशा शारीरिक समस्या निर्माण होतात.

 हिंसाचार आणि आक्रमकता भिनते
पब्जी या ऑनलाइन गेममध्ये हिंसा दाखवण्यात येते. त्याचा परिणाम खेळणाऱ्याच्या मानसिकतेवर होतो. या खेळामध्ये दोनहून अधिकजण युद्धभूमीसारखं ऑनलाइन एकमेकांशी लढू शकतात. आक्रमक लढाईमुळे तरुणासहीत लहान मुलांना देखील या गेमची क्रेझ आहे. गेममध्ये सतत पराभव झाल्यास व्यसनाधीनता देखील वाढते. मुलांतील संवाद कमी होतो. एकाग्रता कमी होऊन त्याचा परिणाम शारीरिक मानसिक आरोग्यावर होतो. झोप लागत नाही. भुकेवर ही परिणाम झाल्याचे निरीक्षण मानसोपचारतज्ज्ञांनी सांगितले आहे.

 पालकांची जबाबदारी
'पब्जी गेम' हा हिंसेची भावना वाढवणारा असल्याने शाळांनी त्यावर बंदी घालावी, अशी मागणी पालकांनी जनहित याचिकेद्वारे केली होती. मात्र,अशा गेमपासून आपल्या पाल्यांना दूर ठेवणे ही पालकांचीच जबाबदारी आहे, असे मत मुंबई हायकोर्टाने नोंदवले आहे. जर पालक आपल्या मुलांना महागडे मोबाइल देत असतील तर त्यांना पब्जीसारख्या गेमपासून दूर ठेवणे, ही त्यांचीच जबाबदारी असल्याचे न्यायालयाने सांगितले आहे.

मोबाइलवरील गेमिंगचे व्यसन सध्याच्या काळात भलतेच वाढल्याचे दिसते. जागतिक आरोग्य संघटनेने या व्यसनाचा आजारांच्या यादीत समावेश केला आहेच, पण त्यासोबतच या आजाराची लक्षणेही सांगितली आहेत. गेमिंगमुळे व्यक्तीवर एवढा ताण येतो की, त्यामुळे तिच्या खासगी, कौटुंबिक, सामाजिक, शैक्षणिक जीवनावर विपरित परिणाम होतात. पालकांनी याबाबत दक्षता घ्यावी.

- डॉ. मधुमीता भाले,मनोविकार तज्ञ,जिल्हा रुग्णालय,औन्ध,पुणे.

Web Title: Mental illness due to PUBG addiction; Attempts to attack the animals

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.